मला नवीन गाडी घ्यायची आहे. माझा रोजचा प्रवास ५० ते ६० किमी आहे. माझे बजेट सहा ते सात लाखांपर्यंत आहे. कृपया मला योग्य गाडी सुचवा. तसेच पेट्रोलवर चालणारी गाडी घ्यावी की डिझेलवर चालणारी, हेही सांगा.

– प्रीती चौधरी

तुम्ही डिझेलवर चालणारी गाडीच घ्या. निस्सान मायक्रा डिझेल ही गाडी तुमच्या बजेटमध्ये मिळू शकते. तसेच ती एक सर्वोत्तम गाडी आहे. तिचे १५०० सीसीचे इंजिन खूप छान आहे आणि क्वालिटीही चांगली आहे गाडीची.

मला आठ लाखांपर्यंत गाडी घ्यायची आहे. डिझेलवर चालणारी, कमी मेन्टेनन्स असणारी, चांगला मायलेज देणारी अशी गाडी मला घ्यायची आहे. कृपया सांगा.

– स्वप्निल िरढे

होंडा जॅझ ही डिझेलवर चालणारी गाडी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. तिचा मायलेज उत्तम आहे. आणि तिचे नवीन रिफाइंड केलेले इंजिन खूप चांगले आहे. हिचा मायलेज २३ किमी प्रतिलिटर एवढा आहे. तसेच होंडाची सíव्हसही चांगली आहे.

’माझे बजेट १० ते १२ लाख रुपयांचे आहे. मी सेडान कार घेऊ की एसयूव्ही. होंडा सिटीबद्दल तुमचे मत काय आहे, की मील ह्य़ुंडाई क्रेटा घेऊ.

– रावसाहेब पाटील

सध्याच्या घडीला एसयूव्ही अधिकाधिक आरामदायी आहेत. सेडानपेक्षाही त्या चांगल्या असतात. त्यामुळे मी तुम्हाला रेनॉ डस्टर ही गाडी सुचवेन, ह्य़ुंडाई क्रेटापेक्षा नक्कीच डस्टर चांगली आहे. मात्र, तुम्हाला स्पेसऐवजी कम्फर्ट महत्वाचा वाटत असेल तर क्रेटा घ्या, असे मी सुचवेन.

’माझे बजेट चार लाख रुपये आहे. ह्य़ुंडाई ईऑनबद्दल आपले मत काय आहे. या गाडीचे रनिंग कसे आहे.

– सतीश निर्मळे.

ईऑन ही गाडी दोन-तीनजणांसाठी योग्य आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त माणसे बसली की दबते. आणि तिचे इंजिनही पॉवरफूल नाही. त्यामुळे तुम्ही अल्टो के१० एलएक्सआय ही गाडी घ्यावी.

’मला बिझनेससाठी गाडी घ्यायची आहे. माझे रोजचे किमान १५० किमी रनिंग आहे. माझे बजेट दहा लाख रुपये असून किमान सात-आठ जण आरामात बसू शकतील अशी गाडी सुचवा.

– चिंतामणी कुलकर्णी

तुमचे रोजचे रनिंग १५० किमी असेल तर तुमच्यासाठी डिझेलची रेनॉ लॉजी सोयीची ठरेल. एन्जॉय ही थोडी लहान असून कम्फर्टला जरा कमी आहे. टॅक्सी म्हणून घ्यायची असेल तर शेवरोले एन्जॉय चांगली आहे. परंतु प्रायव्हेटसाठी लॉजी चांगली आहे.

ह्य़ुंदाई कंपनीबद्दल आपले मत काय आहे. मला कॉम्पॅक्ट सेडान श्रेणीत डिझायरपेक्षा अ‍ॅक्सेंट प्रशस्त वाटली. कुठली गाडी घ्यावी. ह्य़ुंडाईच्या इंजिनात काही अडचण नाही ना.

– सुमीत जुमडे

तुम्हाला जर पेट्रोल गाडी घ्यायची असेल तर मारुती डिझायर ही गाडी घ्या. हिचा मायलेज उत्तम आहे. आणि डिझेलवर चालणारी गाडी घ्यायची असेल तर टाटा झेस्ट घ्या. हिचा मायलेज २० किमी प्रतिलिटर एवढा आहे आणि बसण्यासाठीही गाडीत प्रशस्त जागा उपलब्ध आहे. ह्य़ुंडाई अ‍ॅक्सेंट या दोन्ही गाडय़ांपेक्षा लहान आहे. आणि सव्‍‌र्हिसही तितकीशी चांगली नाही.

मारुती अर्टिगा की शेवरोले एन्जॉय यापैकी कोणती गाडी घ्यावी याबाबत संभ्रम आहे. लांबच्या प्रवासासाठी कोणती गाडी चांगली ठरेल.

– युवराज पालांडे, ठाणे</p>

सात आसनी गाडीसाठी मी तुम्हाला शेवरोले एन्जॉय ही गाडी सुचवेन. मात्र, तुम्ही क्वचितच सात जण फिरत असाल तर स्विफ्ट किंवा रिट्झ या गाडय़ा चांगल्या आहेत. अर्टिगा ही थोडी महाग आहे आणि किमतीच्या मानाने तिच्यात सुविधा कमी आहेत. मात्र, तुमचे बजेट आणखी थोडे जास्त असेल तर मी रेनॉ लॉजी ही गाडी सुचवेन.

मला इलेक्ट्रिक कार घ्यायची आहे. मी सध्या पुण्यात राहते. मात्र, पुण्यात अशा गाडय़ांचे सíव्हस सेंटर्स आहेत काय.

– रेखा कांबळे

तुम्ही केवळ शहरातच फिरत असाल तर मी तुम्हाला इलेक्ट्रिक कारचा पर्याय सुचवणार नाही. परंतु तुम्ही दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी जाणार असाल तर नक्कीच इलेक्ट्रिक कार चांगला पर्याय आहे. पंरतु या गाडय़ा महाग असतात आणि त्यांचा मेन्टेनन्सही महाग असतो.

या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.