चैतन्य प्रेम

जन्माला आल्यापासून आपण अनेक गोष्टींना भीत असतो आणि अनेक गोष्टींबाबत निर्धास्तही असतो. गंमत अशी की, आपल्याला सर्वाधिक भीती मरणाची असते, तर जगताना आपण अहंभावात निर्धास्त असतो! प्रत्यक्षात माणसानं मरणाला भिऊ  नये, मरणाची चिंता करू नये; पण अहंभावाला भ्यावं, अहंभावाची चिंता बाळगावी, असं संतांना वाटतं. मरणाची चिंता नसावी, पण जगण्याची कदर असावी. आपल्याला जगण्याची, माणूस म्हणून जगण्याची जी संधी मिळाली आहे, तिचा खरा आणि पूर्ण लाभ घेता आला पाहिजे. जीवनात कर्तृत्व अवश्य असावं. परिश्रमानं कमावलेल्या भौतिक संपदेचाही अवश्य उपभोग घ्यावा, पण कर्तृत्वाचा अहंकार नसावा. मन, चित्त, बुद्धीला अहंकाराचा, गर्वाचा, आढय़तेचा स्पर्श नसावा. पण या गोष्टींचं सतत भान राहावं म्हणून विचाराचा सत्संग घडावा लागतो. प्रत्यक्ष सत्पुरुषाचा संग हा दुर्लभ असला, तरी संत-सत्पुरुषांच्या विचारांचा संग मिळवणं आणि टिकवणं ही अशक्य कोटीतली गोष्ट नसते. त्यासाठी संतांच्या अभंगांचं मनन आणि चिंतन हा फार परिणामकारक उपाय असतो. संतांचे अनेक अभंग हे आपल्याला सावध करतात, जागवतात. आपल्याला मनानं व्यापक व्हायची शिकवण देतात. संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे. त्यात ते म्हणतात :

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
siblings jealousy
भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 

‘‘मायबापे जरी। सर्पीण की बोका। त्यांचे संगे सुखा। न पवे बाळ?।।१।। चंदनाचा शूळ। सोनियाची बेडी। सुख नेदी फोडी। प्राणनाश।।२।। तुका म्हणे नरकी। घाली अभिमान। जरी होय ज्ञान। गर्व ताठा।।३।।’’

तुकाराम महाराज म्हणतात की, साप असो वा बोका असो, त्यांची पिल्लं त्यांच्याजवळ सुखानंच नांदतात ना? आपल्या लहान बाळाला आपण सापाजवळ निर्धास्तपणे ठेवू शकत नाही. अगदी बोक्यापाशीही नाही. कारण साप चावेल आणि बोका नखही मारील; पण सापाचं पिल्लू सर्पिणीपाशी आणि मांजरीची पिल्लं तिच्यापाशी आनंदात पहुडतातच ना? पण चंदन कितीही शीतल असलं आणि सोनं कितीही मौल्यवान असलं तरी चंदनाचा शूळ आणि सोन्याची बेडी काही सुखकारक नसते! चंदन शीतल आहे म्हणून पेटतं चंदन काही कुणी काखेत धरू शकत नाही. तसंच चंदनाच्या सुळावर कोणाला चढवलं, तर तो प्राण नाश करणाराच असतो. तसंच लोखंडाऐवजी सोन्याच्या बेडय़ा पायात घातल्या तरी त्या आनंददायक नसतात. आपल्या पराधीनतेचं वास्तव काही त्या दूर करीत नाहीत. त्याचप्रमाणे ज्ञानासारखी श्रेष्ठ आणि पवित्र गोष्ट जगात नसली तरी त्या ज्ञानाचा गर्व काही पवित्र नसतो! तो अंत:करण मलिन करतो आणि माणसाला हीन भावात अडकवतो. आता गंमत अशी की, वरवर पाहता या अभंगाच्या तिन्ही चरणांचा परस्परांशी काही संबंध आहे असं वाटत नाही. अमूर्त शैलीतील चित्रातील रेषा, आकृत्या आणि रंगसंगतीचा एकमेकांशी असलेला मेळ आणि त्यातून चित्रकार नेमकं काय पोहोचवू पाहतो ते कळलं नाही तर जसं व्हावं, तशी गत होते. म्हणजे प्रत्येक रेषा वा आकृती वा रंगफटकार हा स्वतंत्रपणे आकर्षक भासतो; पण त्यांच्यातला मेळ न उमगल्यानं एकसंध अर्थठसा उमटत नाही, तशी काहीशी गत या अभंगानं होते. म्हणून थोडं आणखी वेगळ्या प्रकारे, वेगळ्या कोनातून त्याचा मागोवा घेतला पाहिजे!