लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा घवघवीत यश मिळालं असून २०१४ ची पुनरावृत्ती करत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाप्रणीत लोकशाही आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. २०१४ मध्ये भाजपाने २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी तब्बल ३०० हून अधिक जागांवर धडक दिली असल्याने एकहाती सत्ता स्थापित करण्याची क्षमता पुन्हा कायम राखली आहे. दरम्यान भोपाळ मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.

दिग्विजय सिंह यांनी हा महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांच्या विचारसरणीचा विजय आहे अशा शब्दांत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे की, ‘आज देशात महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांची विचारसरणी जिंकली आहे तर महात्मा गांधींच्या विचारसरणीचा पराभव झाला आहे. हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे’.

भाजपाच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर मोठय़ा मताधिक्याने विजय मिळवला. मध्य प्रदेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सत्ता हिसकावून घेणाऱ्या काँग्रेसची लोकसभेच्या निवडणुकीत दयनीय अवस्था झाली. राज्यातील २९ पैकी २८ जागांवर भाजपाने विजय मिळवला असून फक्त एका जागा काँग्रेसला मिळाली आहे. छिंदवाडा मतदारसंघातून मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल यांनी काँग्रेससाठी एकमेव विजय मिळवून दिला आहे. भोपाळ मतदारसंघात