भाजपाने राजस्थानची विधानसभा निवडणूक जिंकलेली असली तरी अद्याप नव्या मुख्यमंत्र्यांची निवड बाकी आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे सर्वांत पुढे असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळावी यासाठी राजस्थान भाजपाचे अनेक नेते प्रयत्न करीत आहेत. असे असतानाच आता एका भाजपा आमदाराच्या वडिलांनी वसुंधरा राजे यांच्या पुत्रावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे आता वसुंधरा राजे यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग आणखी खडतर झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

“माझ्या मुलाला जयपूरच्या बाहेर एका रिसॉर्टवर ठेवले”

वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह हे खासदार आहेत. त्यांच्यावर भाजपाचे नवनिर्वाचित आमदार ललित मीना यांचे वडील हेमराज मीना यांनी गंभीर आरोप केले आहेत. वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह ४ डिसेंबर रोजी माझ्या मुलाला भेटायला आले होते. ही भेट झाल्यानंतर माझ्या मुलाला त्यांनी जयपूरच्या बाहेर असलेल्या एका रिसॉर्टवर ठेवले होते, असा आरोप हेमराज यांनी केला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाच्या नेत्यांतच अंतर्गत स्पर्धा लागलेली आहे. असे असतानाच आता वसुंधरा राजे यांच्या पुत्रावर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत.

dispute between mahayuti is not solved in Nandurbar Shinde group still away from campaigning
नंदुरबारमध्ये महायुतीतील वाद मिटेनात, शिंदे गट अजूनही प्रचारापासून दूर
Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

“ललित यांना थेट रिसॉर्टवर का नेण्यात आले?”

हेमराज मीना यांनी ललित मीना यांना रिसॉर्टवर ठेवल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आमचा संपूर्ण परिवार जयपूरला आहे. असे असताना ललित यांना थेट रिसॉर्टवर का नेण्यात आले. ललित यांना पक्षाच्या कार्यालयात जायचे होते; मात्र त्यांना कार्यालयात जाऊ दिले नाही. मी ललित यांना परत आणण्यासाठी रिसॉर्टवर गेलो होतो; पण मला तेथे काही लोकांनी अडवले, असा आरोपही हेमराज यांनी केला. “मी माझ्या मुलाला घरी परत आणण्यासाठी गेलो होतो. मात्र, तेथे असलेल्या पाच ते १० लोकांनी मला रिसॉर्टमध्ये जाऊ दिले नाही. माझ्यासोबतही १० ते १५ लोक होते. त्यांच्या मदतीने मी ललित यांना परत आणू शकलो,” असे हेमराज म्हणाले.

रिसॉर्टमध्ये एकूण पाच आमदार

ललित यांच्यासह त्या रिसॉर्टमध्ये एकूण पाच आमदार होते, असा दावाही हेमराज यांनी केला. त्यामध्ये ललित यांच्यासह बारण जिल्ह्यातील अंता मतदारसंघाचे आमदार असलेले कुंवरलाल, बरण अत्रू मतदारसंघाचे आमदार राधेश्याम बैरवा, डाग मतदारसंघाचे आमदार कालूराम, ठाणा मतदारसंघाचे आमदार गोविंद प्रसाद या आमदारांचा समावेश होता, अशी माहिती हेमराज यांनी दिली.

“मी दुष्यंत यांना कॉल केला होता; मात्र…”

कंवरलाल यांनी मला रिसॉर्टमध्ये जाऊ दिले नाही. ते भांडण करण्यासाठी तयारच होते. ललित यांना घेऊन जाण्याआधी तुम्ही दुष्यंत सिंह यांच्याशी बोला. त्यानंतरच तुम्ही ललित यांना घेऊन जाऊ शकता, असे मला कुंवरलाल सांगत होते. मी दुष्यंत यांना कॉल केला होता; मात्र त्यांनी फोन उचलला नाही, अशी माहितीही हेमराज मीना यांनी दिली.

ललित मीना यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही

हेमराज यांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली आहे. ललित मीना यांनी मात्र या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

“आम्ही एका हॉटेलवर एकत्र राहण्याचे ठरवले”

दरम्यान, कुंवरलाल यांनी हेमराज यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. दुष्यंत सिंह यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हा संपूर्ण कट रचला जातोय, असा आरोप त्यांनी केला. “आमचा विजय झाल्यानंतर झालावाड-बारण लोकसभा क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांत आमचा विजय झाल्यानंतर आम्ही विजयी रॅली काढली. त्यानंतर ललित मीना यांच्यासह आम्ही सर्व जण संघाच्या, तसेच भाजपाच्या बारण येथील कार्यालयात गेलो. त्यानंतर आम्ही आमच्या निवासस्थानी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता आम्ही जयूपरकडे निघालो. तेथे आम्ही एका हॉटेलवर एकत्र राहण्याचे ठरवले. त्यात तीन आमदार हे बारण आणि दोन आमदार हे झालावाड येथील होते,” अशी माहिती कुंवरलाल यांनी दिली.

“मी कोणालाही ओळखत नव्हतो. म्हणूनच…”

“५ डिसेंबर रोजी सकाळी २.३० वाजता ३० ते ४० लोक आम्ही थांबलेल्या रिसॉर्टवर आले. मी त्यांच्यापैकी कोणालाही ओळखत नव्हतो. याच कारणामुळे मी त्यांना अडवले. कोणी अनोळखी व्यक्ती रात्री येत असेल आणि नव्याने निवडून आलेल्या आमदाराला घेऊन जाण्यासाठी विचारणा करत असेल, तर मी काय करायला हवे होते. मी त्या आमदाराच्या कुटुंबीयांना दुसऱ्या दिवशी सकाळी काय उत्तर दिले असते” असेदेखील कुंवरलाल यांनी सांगितले.

“१० ते १५ मिनिटांनी ललित यांचे वडील आल्यानंतर मी ललित यांना जाऊ दिले. ज्या पद्धतीने हा प्रसंग घडला. त्यावरून हा एक कटच होता, असे मला वाटतेय,” असा दावाही कुंवरलाल यांनी केला.

“भाजपाचे कार्यकर्ते पक्षाला आपली आई समजतात”

दरम्यान, भाजपाला राजस्थानमध्ये बहुमत मिळालेले आहे. येथे भाजपाचे ११५ आमदार निवडून आले आहेत. मात्र, येथे मुख्यमंत्रिपदासाठीच्या नावावर अद्याप एकमत झालेले नाही. भाजपाकडून अशा प्रकारची गटबाजी नाकारली जात आहे. भाजपाचे नेते अर्जुन सिंह यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची गरज नाही. भाजपाचे कार्यकर्ते हे पक्षाला आपली आई समजतात; तर पक्षाचे कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी मंदिर आहे,” असे अर्जुन सिंह म्हणाले.