छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २० मतदारसंघांसाठी मतदान झाले. २०१८ झाली ७८ टक्के मतदान झाले होते. त्याची तुलना करता, यावेळी मतदानात १.५५ टक्क्याची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाने बुधवारी (८ नोव्हेंबर) सांगितले. २० पैकी ११ मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला असल्याचे दिसून आले. मात्र, त्याच वेळी उर्वरित नऊ मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी मागच्या निवडणुकीच्या तुलनेत काही प्रमाणात घसरली असल्याचेही लक्षात आले.

“हा बॅलेटचा बुलेटवर विजय आहे”, अशा शब्दांत निवडणूक आयोगाने वाढलेल्या मतदानाचे वर्णन केले. मतदान झालेल्या २० मतदारसंघांपैकी १२ मतदारसंघ असे आहेत, जिथे नक्षलवादाचा थेट प्रभाव असतो. इतर मतदारसंघही नक्षलप्रभावित असले तरी ते अतिसंवेदनशील नाहीत.

slight increase in voting percentage in Akola Lok Sabha constituency compared to 2019
अकोल्यात वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर? मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ
akola lok sabha marathi news, akola loksabha voter turnout marathi news
अकोल्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ, एकूण अंतिम मतदान ६१.७९ टक्क्यांवर
Rural voters are more vigilant than urban ones with an average voter turnout of 60 percent
अकोला : शहराच्या तुलनेत ग्रामीण मतदार अधिक सजग, सरासरी ६० टक्के मतदान; उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद
Nagpur, BJP MLA sister, deprived of voting,
नागपूर : भाजप आमदाराच्या भगिनीचेच नाव मतदार यादीतून वगळले

निवडणूक आयोगाने सांगितले की, कोंदगाव व बिजापूरचा अपवाद वगळला, तर बस्तर क्षेत्रातील सर्व १० मतदारसंघांत मतदानाचे प्रमाण यावेळी वाढल्याचे दिसून आले. बंदुकीच्या धाकाला न जुमानता, मतदारांनी मतदान करीत लोकशाही सदृढ होण्याला प्राधान्य दिले, अशी भावना आयोगाने व्यक्त केली.

हे वाचा >> Chhattisgarh Election : मतदान केंद्रांवर नक्षली हल्ले, तीन जिल्ह्यांमध्ये चकमकी, CRPF चे जवान जखमी

योगायोगाने ज्या नऊ मतदारसंघांत मतांची टक्केवारी घसरली, त्यातील सात मतदारसंघ दुर्ग प्रांतात येतात. बस्तर प्रांतात काही दिवसांपूर्वी हिंसक घटना होऊनही बऱ्यापैकी मतदान झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. मतदान होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी नारायणपूर मतदारसंघात एका भाजपा नेत्याची हत्या करण्यात आली होती, तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी कानकेर येथे झालेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. या हिंसक घटनांनंतरही मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले.

मतदानाच्या दिवशीही (७ नोव्हेंबर) नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराच्या १० घटना घडल्या. त्यापैकी सहा घटनांमध्ये गोळीबार करण्यात आला होता.

राज्य निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष सुशील त्रिवेदी यांनी सांगितले की, नक्षलवादाचा मतदानावर अतिशय कमी प्रभाव राहिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी या परिसरात जाहीर सभा घेतल्या. त्याचा चांगला परिणाम झाला आणि मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. त्याशिवाय बस्तर प्रांतात १२६ नवीन मतदान केंद्रे उभारल्यामुळे त्याचाही चांगला परिणाम दिसून आला.

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार १२६ नवीन मतदान केंद्रांवर ६८,४४१ एवढ्या मतदानाची नोंदणी झाली. तसेच कल्लेपल, चित्रकूट या ठिकाणच्या मतदान केंद्रांवर नक्षलवादाचा प्रभाव असल्यामुळे त्यांना दुसरीकडे हलविण्यात आले होते. त्याचाही चांगला परिणाम दिसून आला आणि मतदानाची आकडेवारी ३.६८ टक्क्यांवरून ६५.३ टक्क्यांवर पोहोचली.

याचप्रमाणे केशकाल खोरे व भंडारपाल येथे नवीन मतदान केंद्रे उभारल्यामुळे चांगले मतदान झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी शून्य टक्के मतदान झाले होते. मात्र, यावेळी अनुक्रमे ७२.४१ टक्के व ८३.६८ टक्के मतदान झाल्याचे निदर्शनास आले. कोंटा या नक्षलप्रभावित मतदारसंघात मंकापाल व करीगुंदम येथे नवे मतदान केंद्र उभारल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ पाहायला मिळाली. अनुक्रमे १.९८ टक्के व ६८.२२ टक्क्यांवरून ही वाढ थेट ७.६१ टक्के व ७०.०२ टक्क्यांवर गेल्याचे निदर्शनास आले.

आणखी वाचा >> Chhattisgarh Election : नक्षलग्रस्त बस्तरमध्ये आज मतदान; न्यूटन चित्रपटाची कथा इथे कशी लागू पडते?

बस्तर प्रांतातील पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. म्हणाले की, मतदान पार पाडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी सोडल्यानंतर सर्व सुरक्षा कर्मचारी आपापल्या तळावर रस्ते मार्गाने सुरक्षित परतले आहेत. मतदानाच्या दिवशी सुकमा येथे झालेल्या आयईडी स्फोटात कोब्रा तुकडीतील एका जवानाच्या पायाला गंभीर दुखापत झाली; तर सुकमा येथे झालेल्या चकमकीत चार कोब्रा जवानांना किरकोळ दुखापती झाल्या.