“आधी जेव्हा त्यांचं (काँग्रेस) सरकार होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का? तुम्हाला हे मान्य आहे का?”, असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी राजस्थानमधून विचारला होता. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आजही उमटत आहेत. दरम्यान, हे वक्तव्य चर्चेत असताना नरेंद्र मोदी यांनी पुन्हा काँग्रेसवर टीका केली आहे. आजही ते राजस्थान येथे बोलत होते.

“२००४ मध्ये काँग्रेसची केंद्रात सत्ता आली तेव्हा आंध्र प्रदेशमध्ये एससी आणि एसटीतील आरक्षण कमी करून ते मुस्लिम समुदयाला देण्याचं सर्वांत पहिलं काम केलं. काँग्रेसचा हा पायलट प्रोजेक्ट होता. हा प्रयोग काँग्रेस संपूर्ण देशात राबवणार होती. २००४ ते २०१० पर्यंत काँग्रेसने चारवेळा आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला. पण कायदेशीर बाबींमुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या जागृकतेमुळे ते काँग्रेसचे मनसुबे उधळले गेले.

I challenge Modi Said Mallikarjun Kharge
“मोदींमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी ‘हे’ करावं”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं जाहीर आव्हान!
Bachhu Kadu amravati rally
अमरावतीमध्ये राडा; अमित शाह यांच्या सभेला बच्चू कडूंचा विरोध, पोलिसांसमोर ठिय्या
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा >> Video: “काँग्रेस मुस्लिमांना, जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल”, पंतप्रधान मोदींचं राजस्थानच्या सभेत विधान!

“व्होट बँकेच्या राजकारणामुळे आरक्षण देण्याचा खेळ करण्यात आला. काँग्रेसने असे प्रयोग जाणूनबुजून केले. हे सर्व संविधानाच्या मूळ भावनेच्या विरोधात होतं. परंतु, काँग्रेसने संविधानाची पर्वा नाही केली, बाबासाहेब आंबेडकरांची पर्वा नाही केली. जेव्हा कर्नाटकात भाजपा सरकार आलं, तेव्हा संधी मिळाल्यावर त्यांनी एससी एसटीतून काढून घेतलेलं आरक्षण दिलं पुन्हा दिलं. यामुळे काँग्रेसचा देशभऱात चिडपापड झाला. मोदी स्वतःला काय समजतो, असं काँग्रेसने विचारलं. मोदींना संविधान समजतं. बाबासाहेब आंबेडकरांची पूजा करणारा व्यक्ती आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

धर्माच्या आधारावर आरक्षण

“काँग्रेस आणि इंडिया आघाडी जेव्हा सत्तेत होतं तेव्हा दलित, मागासांचे आरक्षण काढून घेऊन खास जमातीला वेगळं आरक्षण देऊ इच्छित होते. हे संविधानाच्या विरोधात होतं. आरक्षणाचा हक्क बाबासाहेबांनी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना दिला. काँग्रेस आणि इंडी आघाडी धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देऊ इच्छित होते, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.