सांगली : सांगलीच्या जागेबाबत कॉंग्रेस नेत्यांची समजूत काढण्यासाठी उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगलीत असताना विशाल पाटील यांनी सांगलीकराना खुले पत्र लिहून सांगलीचा गड केवळ लढवायचा नव्हे तर जिंकायचा आहे असा संदेश देत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत शनिवारी दिले. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

पत्रात पाटील म्हणतात, मागच्या काही वर्षांत सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झाले आहे.

Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
Sangli, dilemma, Sanjay Raut, lok sabha election 202, shiv sena, congress
सांगली दौऱ्यात संजय राऊत यांची चोहोबाजूने कोंडी
shalini patil vishal patil
शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांचे कान टोचले, अपक्ष लढण्याच्या चर्चेवर म्हणाल्या, “घरातल्या कार्यालयात बसून…”

हेही वाचा – नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता

हेही वाचा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?

स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर. आर. पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे.