संदीप नलावडे, लोकसत्ता

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही हिमालयाच्या कुशीत वसलेली राज्ये. दोन्ही राज्यांत लोकसभेचे एकूण नऊ मतदारसंघ. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत सर्व नऊ मतदारसंघांत भाजपचेच उमेदवार विजयी झाले. गेल्या वर्षी हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता आल्याने काही बदल होणार काय? हा मुद्दा आहे.

prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”

दोन्ही राज्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. हिमाचल प्रदेशात लोकसभेच्या चार जागा आहेत. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी चारही मतदारसंघांत मतदान होणार आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत चारही जागांवर भाजपने विजय मिळविला. मात्र दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने या राज्यांत पुन्हा सत्ता मिळविली. विधानसभा निवडणुकीतील हे यश लोकसभा निवडणुकीत टिकवण्यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागणार आहे. कारण फाटाफुटीच्या राजकारणाने ग्रस्त असलेल्या काँग्रेसला हे यश मिळविणे फार सोपे नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे सहा आमदार फोडण्यात भाजपला यश आले.

हेही वाचा >>> खरगेंची मानसिकता तुकडे-तुकडे टोळीची! अनुच्छेद ३७०वरून पंतप्रधान मोदींची टीका

भाजपने चारही मतदारसंघांत उमेदवारांची घोषणा केली असली तरी  काँग्रेसकडून उमेदवारीबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. मंडी या राज्यातील सर्वात मोठया  मतदारसंघात भाजपने यंदा अभिनेत्री कंगना राणावतला उमेदवारी दिली आहे. कंगना आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह या नेत्या दररोजच एकमेकांवर शरसंधान साधत आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना हमीरपूरमधून आणि सुरेश कुमार कश्यप यांना सिमल्यातून भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर कांगडामधून ज्येष्ठ नेते किशन कपूर यांना पुन्हा संधी न देता राजीव भारद्वाज या नव्या उमेदवाराला रिंगणात उतरविण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये आव्हान

हिमाचल प्रदेशप्रमाणेच उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजप हेच दोन प्रमुख पक्ष आहेत. हरिद्वार हा माजी मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांचा मतदारसंघ.  मात्र यंदा त्यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा पुत्र विरेंद्र रावत यांना तिकीट दिले

आहे.

निवडणुकीतील मुद्दे

निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण आणि प्रमुख तीर्थक्षेत्रे असलेल्या या दोनही राज्यांत  सुविधा देण्यात दोन्ही राज्ये कमी पडत आहेत.  हिमाचल प्रदेशातील पर्यटकांची संख्या घटत असल्याचे चित्र आहे. पर्यटनविकास करण्यासाठीच्या मुद्दयांवर निवडणुकीत भर दिला जाणार आहे. बेरोजगारी, ढासळत चाललेली आरोग्यसेवा, स्थलांतर आदी मुद्दे उत्तराखंडमध्ये प्रभावी ठरणार आहे. नैसर्गिक आपत्तीची समस्या दोन्ही राज्यांमध्ये आहे. जोशीमठसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यावर राजकीय पक्षांकडून भर दिला जाणार आहे.

बसपमुळे मतांचे ध्रुवीकरण?

उत्तराखंडमध्ये मायावती यांचा बहुजन समाज पक्षाचा एकही खासदार आतापर्यंत निवडून येत नसला तरी जय-पराजयाची समीकरणे बदलण्यात या पक्षाचा मोठा वाटा आहे.  यंदाही या पक्षाने पाचही मतदारसंघात उमेदवार उभे केले असल्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निवडणुकीत हरिद्वारमधून बसपच्या उमेदवाराने जवळपास १.१३ लाख मते घेतली होती. इतर मतदारसंघातही बसपच्या उमेदवारांनी राजकीय समीकरणे घडवण्यात मोठा वाटा उचलला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही हा पक्ष काँग्रेस व भाजप या मोठया पक्षांना टक्कर देणार का हे पाहावे लागणार आहे.

२०१९ मधील राजकीय चित्र

हिमाचल प्रदेश

एकूण जागा : ४

भाजप : ४

उत्तराखंड

एकूण जागा : ५

भाजप : ५