मुंबईत ज्या ठिकाणी शिवसेनेची मतं आहेत, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक संथ गतीने मतदान सुरु असून निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे रडगाणं सुरू केलं आहे, असं ते म्हणाले. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “…तर निवृत्ती घेतली असती”; फडणवीसांचं मोठं विधान; उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, “जर वेळ आली”

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Mahadev Jankar viral video
महादेव जानकरांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट, पण त्यांच्या ‘या’ कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही लोटपोट हसाल!
Narendra Modi assertion that he has not lost will not lose
हरलो नाही, हरणार नाही! मोदींचे प्रतिपादन; सर्वसंमतीने निर्णय घेण्याची ग्वाही
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Kangana Ranuat
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी बहीण…”

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली होती. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे सुरू केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढे बोलताना, माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. ६ वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा – “…तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

मुंबईत संथगतीने मतदान सुरु असल्याच्या तक्रारींनंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. तसेच त्यांनी भाजपालाही लक्ष्य केलं होतं. “आज महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. त्यासाठी शेवटचे काही तास बाकी आहेत. यावेळी मतदारांमध्येही उत्साह आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांची खूप गर्दी आहे. मात्र, ज्या मतदान केंद्रावर शिवसेनेची मते आहेत, तिथे मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पराभवाच्या भीतीने जाणीवपूर्वक हा प्रकार सुरू आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असून ते केवळ भाजपाच्या इशाऱ्यावर काम करते आहे”, असे ते म्हणाले होते.