पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते आणि यूपीए सरकारमधील मंत्री राहिलेले अश्विनी कुमार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अश्विनी कुमार यांनी आपला राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला आहे.

अश्विनी कुमार यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात कायदा मंत्री देखील होते. ते जवळपास आठ महिने देशाचे कायदा मंत्री राहिलेले आहेत. याशिवाय अश्विनी कुमार हे सर्वात तरुण अॅडिशनल सॉलिसिटर जनरल देखील राहिले आहेत. १९९१ मध्ये अश्विनी कुमार यांना देशाचे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल बनवण्यात आले होते.

Amravati, Vanchit Bahujan Aghadi,
अमरावतीत ‘वंचित’मध्‍ये फूट; जिल्‍हाध्‍यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा
Amravati, Vanchit Bahujan Aghadi,
अमरावतीत ‘वंचित’मध्‍ये फूट; जिल्‍हाध्‍यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा
congress leadership in delhi advised maharashtra leaders to follow alliance rule
आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात अश्विनी कुमार म्हणाले की, मी ४६ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पक्षाचा राजीनामा देत आहे. तसेच, सोनिया गांधींचे आभार मानत अश्विनी कुमार यांनी त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

” याबाबत विचार केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, सध्याच्या परिस्थितीत आणि माझ्या प्रतिष्ठेनुसार, मी पक्षाच्या बाहेर राष्ट्रीय कार्य अधिक योग्य प्रकारे करू शकतो. ४६ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंत मी पक्ष सोडत आहे आणि आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी कल्पना केलेल्या उदारमतावादी लोकाशाहीच्या वचनावर आधारित परिवतर्नवादी नेतृत्वाच्या विचाराने प्रेरित सार्वजनिक कारणाचा सक्रियपणे पाठपुरवा करण्यास उत्सुक आहे. ” असं अश्विनी कुमार यांनी म्हटलेलं आहे.

तसेच, ”काँग्रेस पक्ष आता पूर्वीसाराखा राहिला नाही. आमच्याकडे पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी परिवतर्नवादी आणि प्रेरणादायी नेतृत्व नाही. मी राजकारणही सोडले नाही आणि जनसेवा देखील सोडलेली नाही. मी देशाप्रती माझे कर्तव्य पार पाडत राहीन.”

याचबरोबर ते म्हणाले की, ” हा एक वेदनादायक निर्णय होता. मी खूप विचार केला आणि लक्षात आले की आज ज्याप्रकारे काँग्रेसची अंतर्गत प्रक्रिया चालू आहे, मी माझ्या सन्मानाने आणि स्वाभिमानाने आता आणखी पुढे जाऊ शकत नाही. मला वाटलं की माझे खांदे एवढे मजबूत नाहीत की उदासीनेतेचा भार सहन करतील. ”

मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अश्विनी कुमार हे अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांचे राज्यमंत्रीही होते. तसेच जानेवारी २०११ ते जुलै २०११ पर्यंत ते संसदीय राज्यमंत्री देखील होते.

तीन वेळा राज्यसभा खासदार –

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते अश्विनी कुमार यांना काँग्रेस पक्षाने तीन वेळा राज्यसभेवर पाठवलेले आहे. अश्विनी कुमार २००२ ते २००४ या काळात राज्यसभेचे सदस्य होते. त्यानंतर २००४ मध्ये काँग्रेसने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले,आणि २०१० मध्ये काँग्रेसने अश्विनी कुमार यांना सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवले होते. म्हणजेच एकूण १४ वर्षे अश्विनी कुमार सतत राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत.
मागील दोन वर्षांत काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे आणि हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे सर्व नेते काँग्रेसच्या यूपीए सरकारमध्ये महत्त्वाची मंत्रीपदे भूषवत होते.