गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने पक्षाविरोधात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे बंडखोर पुत्र उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला आहे. भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालाय. पणजीमधून भाजपाचे बाबूश मोन्सेरात विजयी झालेत.

“अपक्ष उमेदवार म्हणून मी चांगली लढत दिली. मी लोकांचे आभार मानतो. मी निकालामुळे नक्कीच निराश आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया पर्रिकरांच्या मुलाने दिली आहे. उत्पल पर्रिकरांना उमेदवारी न मिळाल्याची चर्चा देश पातळीवर झाली होती. त्यामुळे पणजी येथील निवडणूक प्रतिष्ठेचा विषय ठरला होता.

bhiwandi lok sabha seat, jitendra awhad, bjp, jitendra awhad Alleges BJP, Took Crore from Torrent Power, electoral bond, ncp sharad pawar, suresh mhatre, balya mama, election campaign, lok sabha 2024, election news, marathi news
जितेंद्र आव्हाड म्हणतात, निवडणुक रोख्यांमुळेच टोरंटची दादागिरी वाढली
Chhagan Bhujbal on Hemant Godse
नाशिकमधून छगन भुजबळ यांची माघार! पंतप्रधान मोदी-शाहांचे आभार मानत म्हणाले…
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला
cm eknath shinde
शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; भाजपच्या दबावामुळे उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने २१ जानेवारी रोजी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उत्पल पर्रिकर यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र पक्षाने त्यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आणि वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता..

आपल्या नैतिक मूल्यांसाठी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. मला पणजीतून उमेदवारी नाकारली, याचा अर्थ पक्षात कुणाचा तरी मला विरोध आहे. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे, असं उत्पल यांनी पक्ष सोडताना म्हटलं होतं.