लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून हजारो लोक देशाच्या संसदेत जाण्यासाठी उत्सूक आहेत. काही जणांना मान्यताप्राप्त पक्षाकडून तिकीट मिळतं, तर काही जण अपक्ष उभे राहून आपला झेंडा रोवतात. देशात असेही काही लोक आहेत. जे वर्षानुवर्ष निवडणूक लढवत आहेत, मात्र त्यांना यश काही लाभलेलं नाही. ७८ वर्षीय हसूनराम आंबेडकरी त्यापैकीच एक आहेत. १९८५ पासून अपक्ष निवडणूक लढविण्याची सुरूवात करून २०२४ पर्यंत त्यांनी तब्बल ९८ वेळा निवडणूक लढविली आहे. यंदा त्यांनी दोन ठिकाणाहून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे हसनूराम पराभवाचे शतक करणार का? याबद्दल चर्चा होत आहेत.

मनरेगा योजनेत मजूर म्हणून काम करणारे हसूनराम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मला माहितीये की यावेळीही मी दोन्ही जागांवर पराभूत होणार आहे. पण मी १०० वेळा निवडणूक लढवू इच्छितो, हे माझं ध्येय आहे. त्यानंतर मी निवडणूक लढविणार नाही. आग्रा जिल्ह्यातील खेरागड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आंबेडकरी यांनी १९८५ साली खेरागड विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आग्रा आणि फतेहपुर सिक्री या दोन मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
ramdas athawale marathi news
Video: “गावागावात विचारत आहेत म्हातारी, शरद पवार…”, रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी; फडणवीसांनी लावला डोक्याला हात!

हसनूराम म्हणाले, “१९८५ पासून मी ग्रामपंचायत, विधानसभा, विधानपरिषद, आणि लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. मी राष्ट्रपतीपदासाठीही माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला.” आंबेडकरी हे वारंवार पराभूत असल्यामुळे त्यांना उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध काका जोगिंदर सिंह यांचे ‘धरती पकड’ ही उपमा देण्यात आली आहे. आता हसनूरामही धरती पकड या टोपण नावाने ओळखले जातात. प्रत्येक निवडणुकीत ते जमिनीवर आपटतात, त्यामुळे त्यांना हे नाव दिले गेले आहे.

अपमानाचा बदला घेण्यासाठी पहिल्यांदा निवडणूक लढविली

काका जोगिंदर सिंह यांनी ३०० हून अधिक वेळा निवडणूक लढविली होती. ज्यामध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचाही समावेश आहे. हसनूराम आंबेडकरी यांना त्यांच्या या निवडणूक लढण्याच्या छंदाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, १९८४ रोजी बहुजन समाज पक्षाने मला तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मी तालुका कार्यालयात असलेली सरकारी नोकरी सोडली. मात्र त्यानंतर पक्षाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्याने तिकीट देण्यास नकाल दिला. त्यांनी माझी थट्टा केली. ते म्हणाले, तुला तर तुझी बायकोही मत देणार नाही, मग बाकीचे तुला मतदान का करतील? त्यामुळे मी रागात खेरागड येथून निवडणूक लढविली आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळविली. पुढे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी निवडणूक लढवित राहिलो.