लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळापासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४९ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये मुंबईतील सहा जागांदेखील समावेश आहे. मात्र, यादरम्यान मुंबईत अनेकांकडून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचे पुढे आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून कारवाईदेखील करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live: “हा शिवसेनेच्या इतिहासातला काळा दिवस”, मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान!

कुरार पोलिसांनी रविवारी अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या एका ५३ वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून व्हिस्कीच्या चार बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपासादरम्यान पुढील तारखेला हजर राहण्यासंदर्भात तिला नोटीस जारी करण्यात आली आहे. निडणूक आयोगाच्या भरारी पथकांने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – राज्यात आज अंतिम टप्पा; मुंबई, ठाणे, नाशिकसह १३ मतदारसंघांत मतदान, २६४ उमेदवार रिंगणात

याशिवाय जे.जे मार्ग पोलिसांनीही धर्माच्या नावावर मत मागणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. हा तरुण डोंगरीतील साबू रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोस्टर घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पोस्टरवर धर्माच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी या तरुणाला अटक करत नोटीस जारी केली आहे. तसेच त्याला पुढील तारखेला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा – “तोंडावर कधीच आपटलेत, आता त्यांची तोंड फुटतील”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

पश्चिम उपनगरातील डीएन नगर पोलिसांनीही आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित व्यक्ती ही प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना मुंबई पोलिसांतील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आम्ही भरारी पथकांच्या संपर्कात आहोत. आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.”