उद्धव ठाकरेंनी नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. नकली संतान या मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

मोदी ब्रह्मदेवाचा अवतार नाहीत

“आत्ता या पावट्यांची मजल इतकी गेली आहे की तेलंगणाच्या भाषणात मला नकली संतान म्हणाले आहेत. मी काय यांना बर्थ सर्टिफिकेट मागितलेलं नाही. तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतारही नाहीत. आज तुम्ही चोराच्या हातात धनुष्यबाण दिला आहेत पण मशाल कशी पेटली आहे तुम्हीच बघा. त्यांना प्रश्न असा पडला आहे की देशाची फौज मोदींकडे आहे. भाजपाच्या तिनपाटांपासून ते भांड्याकुंड्यापर्यंत अनेक लोक आहेत. माझ्याभोवती माँच्या आशीर्वादाचं कवच आहे, तसंच या लोकांचं अभेद्य कवच आहे. मला काहीही होणार नाही. मी व्यक्तिगत टीका करत नाही. पण भाजपाला राजकारणात पोरंच होत नाहीत. त्यामुळे आपल्याकडची नकली संतान मांडीवर घ्यावी लागते” असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

devendra Fadnavis uddhav thackeray (1)
“उद्धव ठाकरे म्हणाले, मी यू टर्न घेतोय, शिवसैनिकांसमोर आमची अब्रू…”, फडणवीसांनी सांगितला ‘मातोश्री’वरील घटनाक्रम
sushma andhare raj thackeray
“तेव्हापासून ही बाई हवेत उडू लागली आहे”, सुषमा अंधारेंच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचा हल्लाबोल
Suhas kande on Chhagan Bhujbal Lok sabha Election 2024
‘छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार’, शिंदे गटाच्या आमदाराकडून गंभीर आरोप, राजीनाम्याची केली मागणी
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; म्हणाले, “मी काँग्रेसचा मतदार हे उद्धव ठाकरे म्हणाल्याचं ऐकून बाळासाहेबांच्या आत्म्याला..”
what Sanjay Raut Said?
“गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात फिरतोय, कारण..”, संजय राऊत यांचं नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर
What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर शाब्दिक प्रहार, “टरबूज कोण? मी त्यांना फडतूस, कलंक वगैरे..”
dhananjay munde criticized sharad pawar
सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “कुणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर…”
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil
‘लय फडफड करत होता’; मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

निवडणूक आली की मोदी मुंडावळ्या बांधून तयार

“मोदींची आमच्यावर टीका करतानाची रेकॉर्ड अडकली आहे. रोज येऊन तेच बोलत आहेत की उद्धव ठाकरेंना मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे आणि शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे. हे रोज म्हणणाऱ्या मोदींना मला विचारायचं आहे की तुम्ही बोहल्यावर कितीवेळा उभे राहणार ? निवडणूक आली की मोदीबाबा मुंडावळ्या बांधून तयार राहतात” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

चपराशी झालो तरीही पुन्हा येईन

एकीकडे मोदीबाबा आहेत दुसरीकडे आपले आहेतच पुन्हा येईन, पुन्हा येईन. मुख्यमंत्री होतो, चपराशी झालो तरीही चालेल पण मी पुन्हा येईन. हे तुम्हाला पटतं आहे का? आमच्याकडे बोटं दाखवता? आम्ही काय घराणेशाही केली? आज मी मोदींना पुन्हा आव्हानच देतो आहे. मोदींनी सात पिढ्यांची वंशावळ घेऊन यावी, मी माझी वंशावळ घेऊन येतो. माझे वडील, आजोबा, त्यांचे वडील सगळा इतिहास आणतो. मोदी तुम्ही तुमची वंशावळ घेऊन या, नकली डिग्रीसारखं करु नका. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंची टीका “प्रफुल्ल पटेल नावाची वाह्यात संतान मोदींनी मांडीवर घेतली आहे, छत्रपती शिवरायांचा जिरेटोप..”

मोदी थापा मारतात

कधी सांगतात चहा विकायचो, कधी सांगतात बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात होतो, कधी सांगतात हिमालयात होतो. वाट्टेल त्या थापा मोदी मारत आहेत. मी २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये आलो होतो मोदींना मतं द्या सांगायला. माझी चूक झाली त्यासाठी मी महाराष्ट्राची माफी मागतो आहे. माझी सोन्यासारखी शिवसेना यांनी फोडली, मोदी तुम्ही भगव्याला गद्दारीचा कलंक लावला. याचा पुरावा या मिंध्यांनीच दिला आहे. मिंधे कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं की मी करेक्ट कार्यक्रम केला आणि मोदी-शाह यांनी धनुष्यबाण आणि चिन्ह दिलं. डोकं न खाजवता दाढी खाजवत मिंधे खरं बोलून गेले. त्यांनी हे मान्य केलं की महाराष्ट्राच्या पाठीत मोदी-शाह यांनी खंजीर खुपसला आहे.

हे पण वाचा- “राज ठाकरे भाजपाचं स्क्रिप्ट वाचतात, करमणुकीसाठी निवडणुकीआधी इव्हेंट…”, काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

अमित शाह असेच, ते पण बोलून गेले नकली शिवसेना. मी मागेच बोललो होतो की जो नकली म्हणेल तो बेअकली आहे. कारण गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता अशी गत आहे. आता महाराष्ट्रच यांना जे काही उत्तर द्यायचं आहे ते देणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.