करोना व्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकाराने जगभरात चिंता वाढवली आहे. दरम्यान, ब्रिटनने पाच ते ११ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी लस देण्याचा निर्णय घेतला आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गादरम्यान ब्रिटनमध्ये करोना विषाणूने वेग पकडला आहे. दररोज येथे कोविड-१९ ची एक लाखांहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत.

करोनासोबत लढा देत असलेल्या ब्रिटनने मुलांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनच्या मेडिसिन्स आणि हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (एमएचआरए) ने म्हटले आहे की त्यांना फायझर बायोटेकची लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळले आहे. त्यानंतर पाच ते ११ वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएचआरएचे मुख्य कार्यकारी जून रेनी यांनी सांगितले की, या वयातील मुलांना याचा सकारात्मक फायदा होईल असे पुरावे आहेत.

कोविड-१९ लस मुलांसाठी सुरक्षित आहे का?

१२ ते १७ वर्षे वयोगटाच्या लाखो मुलांना आधीच सुरक्षितपणे डोस मिळाल्यानंतर अमेरिकेच्या नियामकांनी लहान मुलांसाठी फायझरची लस अधिकृत केली. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून पाच ते ११ वर्षे वयोगटातील पाच दशलक्षाहून अधिक मुलांना पहिला डोस मिळाला आहे आणि त्यांच्यामध्ये कोणतीही समस्या आली असल्याची माहिती समोर आलेली नाही.

या वयोगटातील मुलांना फायझर बायोटक लसीचे लहान-आकाराचे डोस मिळतात, जे १२ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला लस देण्यासाठी वापरल्या जाणार्‍या आकाराच्या एक तृतीयांश प्रमाणात आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने एका अभ्यासाच्या आधारे हे प्रमाण निश्चित केले ज्यामध्ये लहान मुलांच्या आकाराचे डोस कोविड-१९ रोखण्यासाठी ९१ टक्के प्रभावी होता. पाच ते ११ वयोगटातील मुलांनी विषाणूशी लढणारे अँटीबॉडीज विकसित झाल्या ज्या किशोरवयीन आणि तरुण तसेच प्रौढांप्रमाणेच होत्या.

एफडीएने ३,१०० लसीकरण केलेल्या तरुणांमध्ये लहान मुलांच्या डोसच्या आकाराच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन केले. नियामकांनी मानले की जगभरातील प्रौढ आणि पौगंडावस्थेतील कोट्यवधी मोठ्या डोसच्या सुरक्षिततेच्या माहितीचा साठा पुरेसा आहे.

फार क्वचितच, किशोरवयीन आणि तरुण प्रौढांना फायझर किंवा मॉर्डनाने बनवलेल्या तत्सम लसीचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, ज्याला मायोकार्डिटिस म्हणतात. हे मुख्यतः तरुण पुरुष किंवा किशोरवयीन मुलांमध्ये आणि सामान्यतः दुसऱ्या डोसनंतर उद्भवते. मात्र ते त्वरीत बरे होतात. तसेच सखोल तपासणीनंतर, अमेरिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी असा निष्कर्ष काढला की लसीचे फायदे त्या लहान धोक्यापेक्षा जास्त आहेत.

कोविड-१९ मुळे हृदयाची जळजळ देखील येते, जी अनेकदा गंभीर स्वरूपाची असते, डॉ मॅथ्यू ऑस्टर म्हणाले. करोना व्हायरस संसर्गानंतर मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम झालेल्या मुलांमध्ये देखील हे कधीकधी उद्भवते.

करोनापूर्वी डॉक्टरांनी मुख्यतः किशोरवयीन मुले आणि तरुण पुरुषांमध्ये नियमितपणे जिवाणू किंवा विषाणूजन्य संसर्ग किंवा औषधांमुळे हृदयाच्या जळजळीचे निदान करत होते. ऑस्टर म्हणाले की एक सिद्धांत असा आहे की टेस्टोस्टेरॉन या महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच लहान मुलांना लहान डोस मिळाल्यास लसीशी संबंधित कोणताही धोका कमी होण्याची अनेक तज्ञांची अपेक्षा आहे.