सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग १५ मे रोजी निवृत्त झाले असून, त्यांची जागा लॉरेन्स वोंग यांनी घेतली आहे. खरं तर ५१ वर्षी लॉरेन्स वोंग हे अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थतज्त्र आहेत. त्यामुळे जवळपास सहा दशकांत ते सिंगापूरचे दुसरे बिगर राजकीय कुटुंबातून आलेले नेते म्हणून सिंगापूरच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. २०२२ पासून उपपंतप्रधान म्हणून काम पाहिलेले वोंग येत्या निवडणुकीत पीपल्स अॅक्शन पार्टीचे नेतृत्व करणार आहेत. खरं तर वोंग यांनी सोशल मीडियावर त्यांचे गिटार कौशल्य दाखवून सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले होते. गिटार वाजवतानाचा त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. कोविड १९ साथीदरम्यान त्यांनी केलेले काम आणि घेतलेल्या निर्णायक निर्णयांमुळेच त्यांना सर्वोच्च पदावर बढती मिळण्यास मदत झाली. १९६५ मध्ये सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वोंग यांचा जन्म झाला. सिंगापूरमध्ये जन्मलेले पहिले नेते म्हणून वोंग यांचे लक्ष्य सिंगापूर आणि तेथील नागरिकांच्या फायद्याचे निर्णय घेण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गिटार वाजवणारे पंतप्रधान व्हायरल

सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग हे अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत. कोविड १९ साथीच्या रोगाविरोधात त्यांनी चांगले काम केले होते. तसेच ते एक चांगले गिटार वादकही आहेत. ५१ वर्षीय वोंग यांचे लग्न झालेले असून, त्यांना कोणतेही अपत्य नाही. सिंगापूरमधील राजकारण्यांच्या तरुण पिढीतून ते पुढे आले आहेत. १९६५ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले ते पहिले नेते पंतप्रधान झाले आहेत. त्यांनी आपले गिटार कौशल्य दाखवण्यासाठी सोशल मीडियावर जाऊन सार्वजनिक समर्थन मिळवले आहे. सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीमधील कायद्याचे सहयोगी प्राध्यापक युजीन टॅन म्हणाले की, “नक्कीच लॉरेन्स वोंग यांच्याकडे लोकांना आपल्यात गुंतवून ठेवण्याचा अत्यंत चांगला मार्ग आहे, लोकांना खिळवून ठेवण्यात ते हुशार आहेत.” वोंग यांनी गिटारद्वारे देशाची गाणी वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?
bjp accept rahul gandhi debate challenge
भाजपाने स्वीकारले राहुल गांधींचे आव्हान; पंतप्रधान मोदी नव्हे तर ‘हा’ युवानेता चर्चेत सहभागी होणार
Ghatkopar hoardings
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत जबाबदार असलेले भावेश भिंडे कोण? बेकायदेशीर बोर्डची लिम्का बुकमध्ये का झाली होती नोंद?
Heeramandi Dark History
स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?
Narendra Modi
“मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो, मला अनेक मुस्लीम मित्र, पण २००२ नंतर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत
What is personality rights Jackie Shroff trademark catchphrase bhidu
जॅकी श्रॉफ कोणत्या अधिकाराखाली ‘भिडू नहीं बोलने का’ असं ठामपणे म्हणू शकतात?
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…

वोंग यांची निर्णय घेण्याची क्षमता अफलातून

वोंग यांच्याकडे सरकारचा प्रदीर्घ अनुभव असताना सिंगापूरच्या उच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी देशातील तरुण नेत्यांमध्ये त्यांना नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. करोना विरुद्ध लढण्यासाठी सरकारी टास्क फोर्सचे सह अध्यक्ष म्हणूनही त्यांना ओळखले जाते. “करोना साथीच्या रोगाच्या काळात त्यांनी चांगले काम केले असून, गरज पडल्यास कठोर उपाययोजना राबवल्या आहेत, असेही टॅन सांगतात. सिंगापूर हे कोविड १९ लस खरेदी करणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक होते आणि सरकारने आर्थिक आणि सामाजिक समर्थनासाठी तब्बल ७४ अब्ज डॉलर (६.१७ लाख कोटी) म्हणजेच GDP च्या २० टक्के खर्च केले. यामुळे सिंगापूरला त्याची व्यापारावर निर्भर असलेली अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत वेगाने वाढवता आली, जेव्हा साथीच्या रोगाशी संबंधित निर्बंध उठले आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास पुन्हा सुरू झाला.

“मला विश्वास आहे की कठोर निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा मी नक्कीच तसे करेन. सिंगापूर आणि सिंगापूरकरांच्या हितासाठी मी काहीही करेन,” असेही वोंग यांनी इकॉनॉमिस्ट मासिकाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यांच्या नेतृत्वशैलीची झलक देऊन त्यांनी प्रकाशनाला सांगितले की, जेव्हा मी मीटिंगला जातो, तेव्हा मला सर्व उत्तरे माहीत आहेत, असे मानून मी सुरुवात करत नाही. मला लोकांच्या मनात काय चाललंय ते जाणून घ्यायचे असते. मला लोकांचा दृष्टिकोन हवा आहे, शेवटी सिंगापूरसाठी सर्वोत्कृष्ट निर्णय आणि परिणाम काय आहेत याचा विचार करायचा आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले.

वोंग यांचे इंस्टाग्रामवर २००००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, जिथे ते स्वतःला “बुकवर्म, गिटार वादक आणि श्वान प्रेमी” असल्याचे सांगतात. “माझ्या वडिलांनी मला वाढदिवसाची भेट म्हणून गिटार दिले, ते एक सरप्राईज गिफ्ट होते,” असंही त्यांनी सांगितलं.

राजकीय नेतृत्व हे कधीही एका घराण्याकडे नसते

त्यांनी अनुक्रमे विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठ आणि युनायटेड स्टेट्समधील मिशिगन ॲन आर्बर विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी हार्वर्ड केनेडी स्कूलमधून सार्वजनिक प्रशासनात पदवी प्राप्त केली आहे. विद्यापीठानंतर त्यांनी नागरी सेवेत आपली कारकीर्द सुरू केली, जिथे त्यांनी दीर्घकाळ सत्ताधारी पीपल्स ऍक्शन पार्टीचे आपल्या कामाने लक्ष वेधले. वोंग पहिल्यांदा २०११ मध्ये संसदेत निवडून आले होते. तसेच संरक्षण आणि शिक्षण मंत्रालयांसह विविध पदांवर त्वरित बढती मिळाली. त्यांनी एनर्जी मार्केट अथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि लीचे मुख्य खासगी सचिव म्हणूनही काम पाहिले होते. वोंग यांची २०२१ मध्ये अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली, हे पद सिंगापूरसारख्या आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र चालवण्याची महत्त्वपूर्ण तयारी मानली जाते. ली यांनी २०२२ मध्ये वोंग यांना उपपंतप्रधानपदी नियुक्त केले आणि त्यांना वारस म्हणून ठामपणे उभे केले. राजकीय नेतृत्व हे कधीही एका घराण्याकडे नसते,” असेही वोंग यांनी गेल्या वर्षी पत्रकारांना सांगितले. राजकीय विश्लेषक टॅन म्हणाले की, ली कुटुंबाबाहेरील कोणीतरी पंतप्रधान होईल हे चांगले लक्षण आहे.