अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून येण्याची संधी कमला हॅरिस यांना आहे. काहीशा अनपेक्षितपणे अध्यक्षपदाची उमेदवारी त्यांच्याकडे आली. कारण २०२४ अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे जो बायडेन यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. पण रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झालेल्या पहिल्याच वादचर्चेत बायडेन चाचपडले, अडखळले. त्यामुळे अध्यक्षीय निवडणूक आणि निवडून आल्यास दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्षपद बायडेन यांना वयपरत्वे झेपणार नाही असा निष्कर्ष काढून डेमोक्रॅटिक पक्षाने बायडेन यांना माघार घेण्याची विनंती केली. बायजेन यांनी ती मान्य केल्यामुळे कमला हॅरिस यांना संधी मिळाली. मात्र त्यांच्यासमोर इतिहासाचे आव्हान आहे. कारण १८३६ नंतर विद्यमान उपाध्यक्षाने अध्यक्षीय निवडणूक जिंकल्याचे एकच उदाहरण आढळते.

बायडेन यांची माघार

जो बायडेन यांना दुसऱ्यांदा अध्यक्षीय निवडणूक लढवायची होती. पण वादचर्चेतील फजितीनंतर त्यांच्यावर माघार घेण्याविषयी दबाव येऊ लागला. अध्यक्षीय निवडणुकीस १००हून कमी दिवस शिल्लक राहिले असताना, नव्याने पक्षांतर्गत निवडणुका घेऊन अध्यक्षीय उमेदवार ठरवणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी मुक्रर केलेल्या आणि विद्यमान उपाध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. हॅरिस यांनी चतुराईने अनेक राज्यांचा दौरा करून, आणि क्लिंटन तसेच ओबामा दाम्पत्य या डेमोक्रॅटिक पक्षातील वजनदार धुरिणांचा पाठिंबा संपादित करत आपली उमेदवारी बळकट केली.

The conflict between RR Aba Patil and Sanjay Kaka Patil over the election of Tasgaon Mayor is intense print politics news
तासगाव नगराध्यक्षाच्या निवडीवरून आबा-काका गटातील संघर्ष तीव्र
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
The Electoral College in US Presidential Elections
अध्यक्षीय निवडणुकीतील “इलेक्टोरल कॉलेज”
ajit pawar ncp searching president for pimpri chinchwad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये शहराध्यक्ष मिळेना
Anura Dissanayake Sri Lanka first Marxist President
अनुरा दिसानायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष
pm narendra modi in quad summit
PM Narendra Modi : “जगात तणाव आणि संघर्ष उद्भवला असताना…”; क्वाड शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका!
Prime Minister Narendra modi arrives in America for Quad conference
‘क्वाड’ परिषदेसाठी पंतप्रधान अमेरिकेत दाखल; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
Joe Biden maintains Donald Trumps India-policy and takes it to the heights
बायडेन यांनी ट्रम्प यांचे भारत-धोरण राखले आणि उंचीवर नेले…

हेही वाचा : एकेकाळी हार्वर्ड विद्यापीठाने नाकारलं होतं, आज आहेत १२ लाख कोटींच्या संपत्तीचे मानकरी, कोण आहेत वॉरेन बफे?

हॅरिस यांचा झपाटा

हॅरिस यांच्याआधी बहुतेक सर्व चाचण्यांमध्ये बायडेन हे ट्रम्प यांच्या तुलनेत पिछाडीवर होते. परंतु कमला हॅरिस यांनी ही पिछाडी भरून काढली असून, आता जवळपास सगळ्या चाचण्यांमध्ये त्या आघाडीवर आहेत किंवा बरोबरीत तरी आहेत. अनेक ठिकाणी प्रभावी भाषणे करून त्या मतदारांना जिंकून घेत आहेत. शिकागोतील डेमोक्रॅटिक मेळावा आणि सीएनएन वाहिनीवरील मुलाखत यांत त्यांचा आत्मविश्वास दिसून आला. भारतीय, हिस्पॅनिक आणि आफ्रिकन मतदारांवर प्रभाव टाकणे आवश्यक असल्याचे त्या जाणून आहेत. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

अध्यक्षांनी निवडणूक न लढवणे दुर्मीळ…

अमेरिकेच्या निवडणूक इतिहासात यापूर्वी केवळ एकदाच विद्यमान अध्यक्षाने संधी असूनही निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. योगायोग म्हणजे त्यावेळीही डेमोक्रॅटिक अध्यक्षानेच असा निर्णय घेतला होता. १९६८मध्ये तत्कालीन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याऐवजी तत्कालीन उपाध्यक्ष हुबर्ट हम्फ्री यांना पाठिंबा जाहीर केला. व्हिएतनाम युद्धामुळे अमेरिकेतील जनमत प्रक्षुब्ध होते. वांशिक अस्वस्थताही मोठ्या प्रमाणात होती. अशा वातावरणात आपण निवडून येण्याची संधी फार नाही अशी अटकळ जॉन्सन यांनी बांधली. त्यांच्याऐवजी उपाध्यक्ष हम्फ्री यांनी निवडणूक लढवली, ते पराभूत झाले. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रिचर्ड निक्सन यांनी त्यांचा पराभव केला.

हेही वाचा : देशात अब्जाधीशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ, भारतीय आता होत आहेत अधिक श्रीमंत; हे कसं घडतंय? जाणून घ्या

उपाध्यक्ष जिंकून येणे त्याहूनही दुर्मीळ!

अमेरिकेच्या इतिहासात १८३६ नंतर चार विद्यमान उपाध्यक्षांनी अध्यक्षीय निवडणूक लढवली. त्यात जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश (थोरले बुश) हेच १९८८मध्ये यशस्वी ठरले. उर्वरित तिघे म्हणजे रिचर्ड निक्सन (१९६०), हुबर्ट हम्फ्री (१९६८) आणि अल्बर्ट गोर ज्युनियर (२०००) निसटत्या मतांनी पराभूत झाले. निक्सन यांना त्यांच्या आधीचे अध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर यांच्या लोकप्रियतेच्या आसपासही पोहोचता आले नाही. त्यांना ताज्या दमाचे डेमोक्रॅट उमेदवार जॉन एफ. केनेडी यांनी हरवले. पण याच निक्सन यांनी पुढे १९६८ मध्ये हम्फ्री यांना हरवले. देशांतर्गत असंतोषाचा फटका हम्फ्री यांना बसला. अल्बर्ट गोर यांच्याकडून अधिक आशा होत्या. बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात अमेरिकी अर्थव्यवस्था सुस्थितीत होती. त्यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश धाकटे यांचे आव्हान होते. पण प्रचारात गोर यांनी क्लिंटन यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मोनिका ल्युइन्स्की प्रकरणामुळे क्लिंटन बदनाम झाले होते. त्या बदनामीचा फटका आपल्याला बसेल, अशी भीती गोर यांना वाटली. पण त्यामुळे क्लिंटन यांच्या अनुभवाचा अभाव त्यांच्या प्रचारात जाणवला आणि याचाच फटका त्यांना बसला. त्यामुळे कमला हॅरिस निवडून आल्या, तर त्या अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपदी निवडून आलेल्या दुसऱ्याच विद्यमान उपाध्यक्ष ठरतील.