ज्ञानेश भुरे

आधुनिक हॉकीत पेनल्टी कॉर्नरचे महत्त्व अधिक वाढत आहे. सामन्यातील कॉर्नरवर गोल होण्याची संख्यादेखील अधिक आहे. हॉकीमध्ये १९०८पासून पेनल्टी कॉर्नरचा नियम आहे. या नियमात गेल्या वर्षी बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी आणि खेळ अधिक मनोरंजनात्मक करण्यासाठी नियमात बचावपटूंना सुरक्षाकवच घालण्यास परवानगी देण्याचा बदल करण्यात आला. विश्वचषक स्पर्धेत हा नियम वापरण्यात येतोय. काय आहे हा नेमका नियम….

Irfan's objection to making Hardik vice-captain
T20 World Cup 2024 : हार्दिकला उपकर्णधार करण्यावर इरफान पठाणने उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, “त्याच्यापेक्षा बुमराह…”
Ban on use of drones due to Prime Minister visit to Pune print news
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामुळे ड्रोन वापरण्यास बंदी
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

पेनल्टी कॉर्नर नेमका कधी दिला जातो?

पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अधिक सुकर जात असल्यामुळे खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या गोलकक्षात घुसून पेनल्टी कॉर्नर मिळविण्याचा प्रयत्न करतात. गोलकक्षात प्रवेश केल्यावर आक्रमकाला गोल करण्यापासून चुकीच्या पद्धतीने अडवल्यामुळे, गोलकक्षात प्रतिस्पर्ध्याकडे चेंडूचा ताबा नसताना किंवा खेळण्याची संधी नसताना बचावपटूने अडथळा आणल्यास, गोलकक्षाच्या २३ मीटरच्या क्षेत्रात बचावपटूने जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्यास, बचाव करणाऱ्या हॉकीपटूच्या पायाला डी क्षेत्रात चेंडूचा स्पर्श झाल्यास किंवा जाणीपूर्वक बचाव करणाऱ्या हॉकीपटूने चेंडू खेळक्षेत्राच्या बाहेर धाडल्यास पेनल्टी कॉर्नर दिला जातो.

पेनल्टी कॉर्नरची प्रक्रिया कधी पूर्ण होते?

पेनल्टी कॉर्नर दिल्यावर त्या वर गोल केल्यास पेनल्टी कॉर्नरची कृती संपते. कॉर्नवर गोल झालाच नाही, तर चेंडू गोलकक्षात पाच मीटरपेक्षा अधिक फिरल्यास किंवा स्कोर लाईनवर चेंडू अडवल्यास पेनल्टी कॉर्नरची प्रक्रिया पूर्ण होते. गोलकक्षात मुसंडी मारल्यावर चाल करणारे खेळाडू चेंडू बचावपटूच्या पायावर मारून पेनल्टी कॉर्नर मिळवितात. पेनल्टी कॉर्नर मिळविणे हे देखील आता एक तंत्र झाले आहे. भारताकडे हरमनप्रीत हा या पद्धतीत निष्णात खेळाडू मानला जातो.

आता पेनल्टी कॉर्नर संदर्भातील ४.२ या नियमात काय बदल झाला?

प्रतिस्पर्ध्यांनी पेनल्टी कॉर्नर मिळविला की तो घेताना अनेकदा चेंडू वेगाने आणि हवेतून जोरात येतो. यामध्ये कधी-कधी चेंडू लागून बचाव करणारा हॉकीपटू जखमी होऊ शकतो. त्यामुळे हॉकी महासंघाने या नियमात सुधारणा करताना बचाव करणाऱ्या खेळाडूंना सुरक्षा कवच घालण्यास मान्यता दिली. आतापर्यंत ही सुरक्षा उपकरणे कॉर्नरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लगेच काढली जात होती. पण, आता नव्या नियमानुसार बचावपटूंना चेंडू २३ मीटरच्या बाहेर पडेपर्यंत सुरक्षा कवच घालण्यास परवानगी देण्यात आली आहे.

विश्लेषण : डॅमरच्या दुष्कृत्यांवर बेतलेल्या कलाकृतीला का मिळाला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार? लोकांनी का केली होती सडकून टीका?

हा नियम का करण्यात आला?

एक तर खेळाडूंची सुरक्षा हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे. अर्थात, खेळाडू सुरक्षा कवच घालून २३मीटरच्या कक्षेबाहेर जाऊ शकत नाही. आतापर्यंत कॉर्नर घेतल्यानंतर लगेच खेळाडूंना सुरक्षा कवच काढावे लागत होते. मात्र, आता चेंडू गोलकक्षात २३ मीटरपर्यंत असेपर्यंत ही उपकरणे घालता येतात. चेंडू नियंत्रणाबाहेर गेला की खेळाडूंनी तातडीने सुरक्षा कवच काढून टाकावी लागतात.

या बदलाला केव्हा सुरुवात झाली?

भारतातच २०२१ मध्ये झालेल्या कुमार गट विश्वचषक हॉकी स्पर्धेत या नियमाची चाचणी घेण्यात आली. प्रशिक्षक खेळाडू आणि तंत्रज्ञांकडून याला पाठिंबा मिळाला. त्यानंतर हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरावर हा नियम अनिवार्य करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत या नियमाचा अवलंब केला जात आहे. पेनल्टी कॉर्नरचे भविष्य काय, याचा अभ्यास करणारी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची एक समिती आहे. तिने हा बदल केला आहे. मात्र, पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत आता या नियमात पुन्हा बदल होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विश्लेषण: भारतात Sperm Donor कोण होऊ शकतं? १० सर्वात महत्त्वाचे निकष जाणून घ्या

सुरक्षा कवचाच्या वापरामुळे पेनल्टी कॉर्नरवर गोल होण्याचे प्रमाण घटले का?

निश्चितच, असे म्हणायला जरूर वाव आहे. विशेष म्हणजे गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत गोल करणाऱ्या पाच खेळाडूंपैकी चार खेळाडू हे पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ होते. यानंतरही कॉर्नरवर गोल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण, बचावपटूंना सुरक्षा कवच घालण्याची मुभा मिळाल्यामुळे ते अधिक धाडसी पद्धतीने गोल वाचविण्यासाठी पुढे येतात. जखमी होण्याची शक्यता असली, तरी बचावपटू गोल वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळेच प्रशिक्षक आता मैदानी गोल करण्याकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत.

नियमामुळे खेळाडूंचे जखमी होण्याचे प्रमाण घटले का?

पेनल्टी कॉर्नरचा बचाव करताना हातमोजे, फेस शिल्ड, गुडघा पॅड अशी विविध साधने सुरक्षेसाठी उपलब्ध होतात. त्यामुळे बचावपटू अधिक धोका पत्करून गोल वाचवू लागले. त्याचबरोबर खेळाडूंच्या जखमी होण्याचे प्रमाणही घटले. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने यासाठी २०१५ ते २०१६ या दरम्यान झालेल्या ११ व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील २९५ सामन्यांचा अभ्यास केला, तेव्हा पेनल्टी कॉर्नरवर खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण १३.९ टक्के होते. यातील बऱ्याच दुखापती या डोक्याला मार बसल्यामुळे झाल्या होत्या. आता खेळाडूंना सुरक्षा कवच घालवण्याची परवानगी दिल्यापासून खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.