युद्धादरम्यान हेरगिरी करण्यासाठी प्राण्यांचा, पक्ष्यांचा वापर केल्याची इतिहासात अनेक उदाहरणं आहेत. आजदेखील अशा प्रकारचे संशयास्पद प्राणी, पक्षी आढळून येतात. कधीकधी तर याच मुद्द्यावरून दोन देशांत वादही होतात. दरम्यान, भारताने नुकतीच एका कबुतराची सुटका केली आहे. हे कबुतर आठ महिन्यांपासून पोलिसांच्या ताब्यात होते. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कबुतराला कैदेत का ठेवण्यात आले होते? याआधी प्राणी, पक्ष्यांचा युद्धात, हेरगिरीसाठी कसा वापर करण्यात येत होता? हे जाणून घेऊ या…

पोलिसांनी सोडून दिलेल्या कबुतराचे सत्य काय?

मुंबई पोलिसांनी ३० जानेवारी रोजी हेरगिरी करणाऱ्या एका संशयित कुबतराची सुटका केली. हे कबुतर चीनहून आल्याची शंका पोलिसांना होती. मे २०२३ मध्ये मुंबईच्या बंदराजवळ या कबुतराला ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा या कबुतराच्या पायात दोन रिंग्स होत्या. या रिंग्ज चीनमधील असल्यासारखे वाटत होते. हे कबुतर हेरगिरी करण्यासाठी भारतात पाठवण्यात आले आहे, असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे या कबुतराला नंतर मुंबईच्या बाई साकारबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल या पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तपास केल्यानंतर ते कबुतर मुळचे चीनचे नव्हे तर तैवानचे असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हे कबुतर वॉटर रेसिंगसाठी प्रशिक्षित करण्यात आले होते, असेही पोलिसांना आपल्या तपासात आढळले. त्यामुळे आठ महिन्यांनी पोलिसांनी त्या कबुतराला मुक्त केले. हे कबुतर तैवानहून उडत भारतात आले होते.

buldhana murder marathi news, buldhana ambedkar jayanti murder marathi news
बुलढाण्यात भीम जयंतीला गालबोट! चाकूहल्ल्यात युवक ठार; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांवर होता दुहेरी ताण
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक
thane theft news, jewellery theft thane marathi news
सुट्टी घेतल्यामुळे सेल्समनची चोरी उघड, १ कोटी ५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; नौपाडा पोलिसांनी केली सेल्समनला अटक

याआधी पकडले दोन कबुतर

हेरगिरीच्या आरोपात याआधीही अनेकवेळा कबुतराला ताब्यात घेण्यात आलेले आहे. मार्च २०२३ मध्ये ओडिसातील पुरीमध्ये अशाच दोन कबुतरांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील एका कबुतराच्या पायावर “REDDY VSP DN” असा संदेश बांधण्यात आला होता, तर दुसऱ्या कबुतराच्या पायावर एक कॅमेरा आणि मायक्रोफोन लावण्यात आला होता.

पहिल्या महायुद्धात कबुतराचा वापर

याआधीही अनेकवेळा कबुतराचा हेरगिरीसाठी वापर करण्यात आलेला आहे. इंटरनॅशनल स्पाय म्युझियमनुसार पहिल्या महायुद्धात कबुतरांवर छोटे कॅमेरे लावले जायचे आणि ते शत्रूंच्या प्रदेशात सोडून दिले जायचे. कबुतर हे कसल्याही हवामानात प्रवास करू शकतात. तसेच त्यांच्या प्रवासाचा वेग अधिक असतो, त्यामुळे युद्धादरम्यान, हेरगिरीसाठी त्यांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे ९५ टक्के प्रकरणांत कबुतरांनी संदेशवहन आणि हेरगिरीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. १९५० पर्यंत कबुतरांचा या कामासाठी वापर केला जायचा.

कबुतराने वाचवले होते १९४ सैनिकांचे प्राण

चेर अमी नावाचे असेच एक कबुतर फार प्रसिद्ध आहे. या कबुतराची शेवटची मोहीम १४ ऑक्टोबर १९१८ रोजी होती. जर्मनीविरुद्धच्या युद्धात एकूण १९४ सैनिकांना वेढा देण्यात आला होता. अशा परिस्थितीत कबुतराने संदेश यशस्वीपणे पोहोचवला होता. या कबुतरामुळे १९४ सैनिकांचे प्राण वाचले होते. या कबुतरावर तेव्हा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, परंतु अशा परिस्थितीतही त्याने आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. चेर अमी नावाच्या या कबुतराचा १३ जून १९१९ मध्ये मृत्यू झाला होता. या कबुतराला फ्रान्सच्या Croix de Guerre पुरस्काराने सन्मानित (मरणोत्तर) करण्यात आले होते.

अन्य कोणकोणत्या प्राण्यांचा हेरगिरीसाठी वापर?

अलीकडच्या काळात कबुतराव्यतिरिक्त इतर प्राण्यांचाही हेरगिरीसाठी वापर करण्यात आलेला आहे. शीतयुद्धाच्या काळात वेगवेगळ्या देशांच्या सरकारांनी हेरगिरी करण्यासाठी अनेक प्राण्यांना अन्य देशांत पाठवलेले आहे. अमेरिकेने याआधी १९६० च्या दशकात हेरगिरीसाठी डॉल्फिनचा वापर केलेला आहे. या डॉल्फिनला अमेरिकन नौदलाने प्रशिक्षण दिले होते. पाणबुड्या, पाण्यातील सुरुंग शोधण्यासाठी तेव्हा डॉल्फिनचा वापर करण्यात आला होता. स्मिथसोनियन मासिकात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

हेरगिरीसाठी मांजरीचाही वापर

याव्यतिरिक्त अमेरिकेने सी लायनचाही (Sea Lions) हेरगिरीसाठी वापर केलेला आहे. शत्रूंची हेरगिरी करण्यासाठी याआधी मांजरीचाही वापर करण्यात आलेला आहे. या मोहिमेला ऑकोस्टिक किट्टी प्रोजेक्ट या नावाने ओळखले जाते. शत्रूंचे संभाषण ऐकण्यासाठी सीआयएने मांजरीचा ‘लिसिनिंग डिव्हाईस’ म्हणून वापर केलेला आहे. ‘बिस्ट ऑफ वॉर’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे.