राखी चव्हाण

जगातील वाढत्या कार्बन उत्सर्जनाशी लढण्यासाठी सौर पॅनलकडे एक पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पाहिले जाते. या सौर पॅनलच्या वापराची क्षमता जेव्हा संपते, तेव्हा मात्र पर्यावरणासाठी ते दुपटीने घातक ठरतात. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात सौर पॅनलचा वापर केला जात आहे आणि अनेक सौर पॅनलचे आयुष्य संपण्याची वेळ आता जवळ आली आहे. त्यामुळे ज्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्याचा वापर केला जात होता, त्याच्या वापरानंतर पर्यावरण संरक्षणाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?

 सौर पॅनलचा कचरा किती वाढणार?

सौर पॅनलच्या वाढीमुळे कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जगभरात २०५० पर्यंत २० कोटी टन सौर पॅनल कचरा जमा होईल अशी भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘इंटरनॅशनल रिन्यूएबल एनर्जी एजन्सी’च्या मते २०४० पर्यंत भारत आणि इंडोनेशियात सौर पॅनलचा कचरा वाढण्याची शक्यता आहे. २०४० पर्यंत वार्षिक सौर पॅनल कचरा एक कोटी टनापर्यंत पोहोचेल. तर २०५० पर्यंत तो दोन कोटी टनपर्यंत जाईल. ‘नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतात ३४ हजार ६०० टन सौर पॅनल कचरा जमा होईल.

सौर पॅनलचे आयुष्य किती?

सध्या वापरात असलेल्या सौर पॅनलचे आयुष्य जास्तीत जास्त २५ वर्षे आहे. जगभरातच पर्यावरणपूरक वीजनिर्मितीसाठी सौर पॅनलच्या वापरावर भर देण्यात आला, त्यांची संख्या आता सुमारे २.५ अब्ज झाली आहे. आता या सौर पॅनलचे आयुष्य संपण्याची वेळ आली आहे. म्हणजेच ते लवकर खराब होऊन त्याचा समावेश आता ‘ई-वेस्ट’मध्ये होणार आहे.

कोणते घटक घातक आणि कसे? 

सौर पॅनल तयार करताना त्यात सुमारे ८० टक्के काचेचा वापर केला जातो. तर इतर घटकांमध्ये अ‍ॅल्युमिनिअम, चांदी, तांबे तसेच सिलिकॉन यांचा समावेश होतो. शिसे, आर्सेनिक आणि कॅडमियम यांसारखे काही प्रमाणात विषारी धातूही असतात. ज्यामुळे कर्करोगाला आमंत्रण मिळते. तसेच या पॅनलमध्ये उष्णता हस्तांतरित करण्यासाठी काही द्रव वापरले जातात आणि हे द्रव कधी कधी गळतात. जे पर्यावरण आणि मानवी जीवनासाठी धोकादायक असतात. यामुळे अनेक आजार होऊ शकतात. ते मातीची गुणवत्तादेखील खराब करू शकतात. सध्या अधिकांश सौर पॅनल कचऱ्यात जातात आणि त्याचा मानवी व पर्यावरणीय आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

पुनर्वापर कठीण कसा?

यातील काचेच्या टाइल्स बनवल्या जाऊ शकतात किंवा सँडब्लास्टिंगमध्ये ते वापरता येते. डांबर तयार करण्यासाठीदेखील ते इतर सामग्रीमध्ये मिसळले जाऊ शकते. मात्र, पॅनलमधील अ‍ॅल्युमिनियम फ्रेम, काच आणि चांदी, तांबे काढून टाकणे. त्याचा पुनर्वापर करणे आणि पुन्हा वापरणे अशक्य नसले तरी यासाठीची  प्रक्रिया अतिशय किचकट आणि खर्चीक आहे. फ्रान्समध्ये जून २०२३ पासून सौर पॅनल पुनर्वापराचा कारखाना उघडला जाणार आहे, अमेरिकेतही असे प्रयत्न सुरू आहेत. भारतात पुनर्वापर उद्योग फार मोठा असला तरी त्याचे स्वस्त मजूर, अनारोग्यकारक वातावरण असे त्याचे भीषण वास्तव असल्याचे पर्यावरणनिष्ठ अपेक्षा पूर्ण होतातच असे नाही. योग्य रीतीने सौर पॅनलचा पुनर्वापर करायचा, तर एका पॅनेलसाठी २५ डॉलपर्यंत (दोन हजार रु.) खर्च येईल, असा अंदाज ‘रिसायकल पीव्ही सोलर’ या कंपनीने गेल्या वर्षी व्यक्त केला आहे.

सौर पॅनलच्या उत्पादनात प्रदूषण कितपत?

सौर ऊर्जा ही स्वच्छ ऊर्जा आहे. पण सौर पॅनल तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळवताना अनेक गोष्टी गुंतागुंतीच्या होऊ लागतात. युरोपियन सौर पॅनल क्षेत्र पूर्वीपेक्षा मोठे होते. मात्र, आता त्यात चीनने आघाडी घेतली आहे. चीन हाच सौर पॅनलसाठी लागणाऱ्या वस्तूंचा जगातील सर्वात मोठा उत्पादक ठरला आहे. सौर पॅनलसाठी लागणारा बहुतांश कच्चा माल केवळ चीनमधूनच येतो. मात्र, सौर पॅनलच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान एक तृतीयांश साहित्य वाया जाण्याच्याही घटना घडतात.

जुन्या सौर पॅनलची किंमत भंगारात किती?

एक किलोवॅट सौर ऊर्जा देणाऱ्या पॅनलचे वजन सुमारे १५-१६ किलो असते. त्याची चौकट अ‍ॅल्युमिनिअमची बनलेली असते आणि त्याचे वजन एक ते दोन किलो असते. उर्वरित पॅनलमध्ये काच व अन्य घटक असतात. भंगार बाजारातील अ‍ॅल्युमिनिअमच्या किमतीत दररोज चढउतार होत असतो. तो ८५ रुपये प्रति किलोग्रॅम असतो. तर काच दोन ते तीन रुपये किलो दराने विकली जाते. याची एकूण किंमत काढल्यास भंगार बाजारात एक किलोवॅट सोलर पॅनलची भंगारातील किंमत सुमारे २०० रुपये भरू शकते.