केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. १९ एप्रिल ते १ जून दरम्यान लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत पार पडणार आहेत, तर ४ जूनला एकाच दिवशी निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. पहिला टप्पा १९ एप्रिल, दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे आणि सातव्या टप्प्याची निवडणूक १ जूनला होणार आहे. यासह अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या चार राज्यांमध्ये एकाचवेळी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा निवडणूक जिंकून हॅटट्रिक करतील की विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला यश मिळेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी विविध वृत्तवाहिन्यांनी देशभरात जनमत सर्व्हे केला. विजयाचे दावे दोन्हीकडून होत आहेत. मात्र जनतेचा कौल कुणाला? कोण कोणावर वरचढ ठरेल? सर्व्हे काय सांगतो? जाणून घेऊ या.

Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
narendra modi rahul gandhi
कर्नाटकमध्ये सर्व मुस्लिमांचा ओबीसीत समावेश, पंतप्रधानांच्या आरोपांनंतर मागासवर्ग आयोगाचा खुलासा; केला ‘हा’ सवाल!
What Mallikarjun Kharge Said?
मल्लिकार्जुन खरगेंची भावनिक साद, “मतं द्या किंवा देऊ नका पण माझ्या अंत्यसंस्काराला जरुर या!”
Raju Shetti, Lok Sabha Election Campaign, krantisinh nana patil, machhindra village, hatkangale lok sabha seat, lok sabha 2024, election Campaign, Raju Shetty in machhindra village, Raju Shetty's Election Campaign, marathi news,
नैतिकतेच्या जोरावर चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकणार; प्रचार शुभारंभ सभेत राजू शेट्टी यांचा विश्वास

एनडीए की इंडिया आघाडी?

न्यूज१८ चे सर्वेक्षण

मेगा न्यूज१८ च्या सर्वेक्षणानुसार, बहुसंख्य जनता सत्ताधारी पक्षाच्या कामगिरीवर समाधानी आहे. त्यांच्यानुसार पंतप्रधान मोदी आणि भाजपा तिसऱ्यांदा निवडून येण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान मोदींनी ‘अबकी बार ४०० पार’चा नारा दिला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए लोकसभेच्या ४११ जागा जिंकेल, असा अंदाज सर्वेक्षणानुसार वर्तवण्यात आला आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला ३२ टक्के मतांसह १०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. ही संख्या २०१९ मध्ये यूपीए सरकारमध्ये मिळालेल्या जागांपेक्षा जास्त आहे. २०१९ मध्ये यूपीएला केवळ ९१ जागा जिंकता आल्या होत्या. सर्वेक्षणातील निकालानुसार, इतर पक्ष २७ जागा जिंकतील, असा अंदाज आहे.

एबीपी न्यूज-सी मतदार सर्वेक्षण:

लोकसभा निवडणुकीपूर्वी एबीपी न्यूज आणि सी वोटर ने केलेल्या मत सर्वेक्षणातून असे दिसून येते की, देशात यंदाही भाजपा बहुमताने विजयी होऊ शकेल. सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, एनडीए ४५.९ टक्के मतांसह ३६६ जागांवर भाजपा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

एबीपी न्यूज-सी वोटर सर्वेक्षणानुसार, इंडिया आघाडी ३९ टक्के मतांसह १५६ जागा जिंकण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत इंडिया आघाडीच्या मतांमध्ये २.५ टक्क्यांनी वाढ होईल. या सर्वेक्षणानुसार काँग्रेसची स्थिती मागील निवडणुकीपेक्षा सुधारण्याची शक्यता आहे. यंदा ५९ जागांवर काँग्रेस उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. ही संख्या २०१९ मध्ये मिळालेल्या ५२ जागांपेक्षा जास्त आहे. डीएमके सारख्या प्रमुख प्रादेशिक पक्षांशी युती केल्यामुळे, तामिळनाडूसारख्या काही राज्यांमध्ये काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

झी न्यूज-मॅट्रिझ सर्वेक्षण:

झी न्यूज आणि मॅट्रिझच्या सर्वेक्षणानुसार, एनडीए ३९० जागा जिंकून इंडिया आघाडीचा पराभव करेल, असा अंदाज आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी ९६ जागा जिंकण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी

न्यूज१८ च्या सर्वेक्षणानुसार, नेतृत्व क्षमतेच्या बाबतीत लोकांनी राहुल गांधींऐवजी नरेंद्र मोदींना पसंती दिली. तब्बल ७३ टक्के लोकांना पंतप्रधान मोदी प्रामाणिक असल्याचे वाटते. तर २७ टक्के जनतेला राहुल गांधी अधिक प्रामाणिक नेते आहेत, असे वाटते. पंतप्रधान लोकांचा विश्वास संपादन करत आहेत आणि संकटांना तोंड देण्यासाठी अजूनही इतरांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत, असे बहुतांश जनतेला वाटते. रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या बाबतीत आणि महागाई नियंत्रित करण्याच्या विषयावरही मोदी यांना राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

एबीपी न्यूज-सी वोटर सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान कोण हवे आहेत? असा प्रश्न केला असता, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहारसह अनेक राज्यांतील जनतेने राहुल गांधींपेक्षा मोदींना प्राधान्य दिले आहे. बहुसंख्य जनतेने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

झी न्यूज-मॅट्रिझच्या सर्वेक्षणात मोदी विरुद्ध गांधी ही चर्चा झालेली नसली तरी सुमारे २३ टक्के जनतेला असे वाटते की, राहुल गांधी पंतप्रधानांना टक्कर देऊ शकतात. या सर्वेक्षणात नऊ टक्के जनतेला वाटते की, राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा निवडणुकांवर सकारात्मक परिणाम होईल, तर २२ टक्के लोकांना वाटते की, या यात्रेचा फारसा परिणाम होणार नाही.

मोठ्या राज्यांमधील परिस्थिती

न्यूज१८ सर्वेक्षणानुसार, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये निर्भेळ यश मिळवण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणातील निकालानुसार, मध्य प्रदेश (२८ जागा), उत्तर प्रदेश (७७ जागा), बिहार (३८ जागा), झारखंड (१२ जागा), कर्नाटक (२५ जागा) आणि गुजरातमध्ये पक्ष सर्व २६ जागा सहज जिंकेल, अशी शक्यता आहे.

महाराष्ट्रात एनडीए ४८ पैकी ४१ जागा जिंकण्याची शक्यता आहे, तर विरोधकांना इतर सात जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष अजूनही ताकदवान आहेत. तृणमूल काँग्रेस आणि डीएमके यांचे पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये वर्चस्व राहिले आहे. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये १७ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये डीएमके-काँग्रेस युती अजूनही प्रबळ आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला तामिळनाडूमध्ये ३९ पैकी ३० जागा मिळण्याचा अंदाज आहे.

एबीपी न्यूज-सी वोटर सर्वेक्षणानुसार, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. भाजपाला पश्चिम बंगालमध्ये १९ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर तामिळनाडूमध्ये डीएमके ३९ जागा आणि बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसीला २३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात अटीतटीची निवडणूक होण्याचा अंदाज आहे. एनडीएला २८, तर विरोधी पक्षांना २० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणूक २०२४ : जाणून घ्यायला हवेत ‘हे’ सात मुद्दे!

झी न्यूज-मॅट्रिझच्या सर्वेक्षणानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला महाराष्ट्रात ६१ टक्के मतांसह ४८ जागा, गुजरातमध्ये सर्व २६ जागा, उत्तर प्रदेशात ७८, तामिळनाडूमध्ये एक, आंध्र प्रदेशमध्ये १३, तेलंगणात पाच, मध्य प्रदेशात २८, पश्चिम बंगालमध्ये १७ आणि कर्नाटकमध्ये २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडीला महाराष्ट्रात तीन जागा, उत्तर प्रदेशात दोन जागा, केरळमध्ये २०, झारखंडमध्ये एक, मध्य प्रदेशात एक, कर्नाटकात पाच, तेलंगणात नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बंगालमध्ये टीएमसीला २४ जागा मिळण्याची शक्यता आहे.