FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धा ही आता अंतिम टप्प्यात आली असून या स्पर्धेतील केवळ २ सामने शिल्लक आहेत. यातील बेल्जीयम विरुद्ध इंग्लंड हा तिसऱ्या क्रमांकासाठी होणारा सामना १४ जुलैला होणार आहे. तर फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया हा अंतिम सामना १५ जुलैला रंगणार आहे. जवळपास महिनाभर रंगलेल्या या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या संघापासून ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांपर्यंत सर्व संघावर बक्षिसाची लयलूट होणार आहे.

यंदाच्या स्पर्धेत फिफाने तब्बल ४०० मिलियन डॉलर्स म्हणजेच ४० कोटी डॉलर्सची बक्षिसे संघांसाठी राखून ठेवली आहेत. केवळ या स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या संघाला ८ मिलियन डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे, तर बाद फेरीतील प्रत्येक फेरीगणिक बक्षिसाची रक्कम १२ ते २४ मिलियन डॉलर्स अशी वाढणार आहे. आणि स्पर्धेच्या विजेत्या संघाला तब्बल ३८ मिलियन डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे.

या आहेत बक्षिसाच्या रकमा –

याशिवाय, काही वैयक्तिक कामगिरीसाठीही बक्षिसे देण्यात येणार आहेत.