29 October 2020

News Flash

FIFA World Cup 2018 : हरभजनचे ‘मेसी’प्रेम

अर्जेटिनाचा नावाजलेला फुटबॉलपटू लिओनेल मेसीचे जगभर चाहते आहेत.

अर्जेटिनाचा नावाजलेला फुटबॉलपटू लिओनेल मेसीचे जगभर चाहते आहेत. भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगही याला अपवाद नाही. गुरुवारपासून सुरू झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आपल्या या लाडक्या खेळाडूच्या प्रेमापोठी हरभजन पूर्ण महिना रात्री-अपरात्रीपर्यंत जागून त्याला प्रोत्साहन देणार आहे. ट्विटरवरील एका संदेशात हरभजनने मेसीला पाठिंबा देणार असल्याचे नमूद केले.

‘‘पुढील एक महिना मी या फुटबॉलपटूसाठी रात्र जागून काढणार आहे. मेसी, तुला विश्वचषकासाठी हार्दिक शुभेच्छा,’’ असे हरभजनने ‘ट्वीट’ केले आहे. २४ जून रोजी मेसी ३१व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्याच्या असंख्य चाहत्यांची यंदा मेसीला विश्वचषक उंचावताना पाहण्याची इच्छा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 3:07 am

Web Title: harbhajan singh lionel messi
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : प्रशिक्षक आणि देशीवाद!
2 FIFA World Cup 2018 : मेसी-माया!
3 FIFA World Cup 2018 : नियंत्रण सौदीचे, पण विजय रशियाचा
Just Now!
X