लेवांडोवस्की विरुद्ध मॅने यांच्यातील संघर्षांवर सर्वांच्या नजरा

रॉबर्ट लेवांडोवस्की आणि सॅडिओ मॅने अशा गुणवान आक्रमकांचा समावेश असलेले दोन संघ जेव्हा एकमेकांविरोधात खेळतात, तेव्हा चाहत्यांना एक थरारक सामना पाहण्याची अनुभूती मिळते हे नक्की. पोलंड विरुद्ध सेनेगल यांच्यात मंगळवारी होणाऱ्या सामन्यात ही चुरस अनुभवण्यासाठी संपूर्ण फुटबॉलविश्व सज्ज झालेले आहे. या लढतीत विजय मिळवून कोणता संघ विश्वचषक मोहिमेची दमदार सुरुवात करतो, हे पाहणे रंजक ठरेल.

vaishali darekar kalyan lok sabha marathi news
कल्याण लोकसभेत वैशाली दरेकर यांच्या प्रचार दौऱ्याकडे ज्येष्ठ शिवसैनिकांची पाठ
bacchu kadu vs ravi rana
“मला अतिशय आनंद होतोय, राणांचा पैसा आणि खासदारकी…”, मैदान नाकारल्यानंतर बच्चू कडूंची घणाघाती टीका
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?

पोलंडचा कर्णधार लेवांडोवस्कीने बायर्न म्युनिच क्लबकडून खेळताना बुंदेस लिगामध्ये हंगामातील सर्वाधिक २९ गोल केले तर, मोहम्मद सलाहच्या अनुपस्थितीत चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात लिव्हरपूलसाठी एकमेव गोल करणारा मॅने सेनेगलचा प्रमुख खेळाडू आहे.

तुम्हाला हे माहीत आहे?

  • वयाच्या ४२व्या वर्षी सेनेगलच्या प्रशिक्षकपदाची भूमिका सांभाळणारे अलिऊ सिस्से हे या विश्वचषकातील सर्वात तरुण प्रशिक्षक आहेत.
  • पहिल्याच विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरी गाठणारा सेनेगल हा एकमेव संघ आहे. २००२मध्ये त्यांनी हा पराक्रम केला होता.