फिफाचा मानाचा विश्वचषक हा अखेर फ्रान्सचा कर्णधार ह्युगो लोरिसच्या हातात विसावला. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी विश्वचषक लोरिसकडे सुपूर्द केला आणि मॉस्कोतल्या ल्युझनिकी स्टेडियमसह अवघं फ्रान्स फटाक्यांच्या आतषबाजीनं उजळून निघालं. ह्युगो लोरिसच्या फ्रान्सनं लुका मॉड्रिचच्या क्रोएशियाचा ४-२ असा धुव्वा उडवून दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. अॅन्टॉइन ग्रिझमन, पॉल पोग्बा आणि किलियन एमबापे या फ्रान्सच्या शिलेदारांनी जबरदस्त कामगिरी बजावून आपल्या देशाला २० वर्षांनंतर पुन्हा एकदा जगज्जेता बनवलं. या सामन्यात फ्रान्सनं विश्वचषक जिंकला तर क्रोएशियानं सगळ्यांची मनं जिंकली. कारण ४१ लाख लोकसंख्या असलेल्या क्रोएशियानं पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाची फायनल गाठली होती. क्रोएशियानं अर्जेन्टिना आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना पाणी पाजून फायनल गाठली होती, पण ह्युगो लोरिसच्या फ्रान्ससमोर त्यांचा टिकाव लागू शकला नाही. कारण फ्रान्सचा संघ हा यंदाच्या विश्वचषकातला सगळ्यात प्रतिभावान संघ होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ह्युगो लोरिससारखा अनुभवी कर्णधार आणि एमबापेसारखा युवा गुणवान खेळाडू फ्रान्सच्या संघाची खरी ताकद म्हणून या विश्वचषकात उभे राहिले.

१९ वर्षीय किलियन एमबापेनं विश्वचषकात फ्रान्ससाठी ४ गोल झळकावून मोलाचा वाटा उचलला. इतकच नाही तर स्पर्धेतला सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कारही आपल्या नावावर केला. १९९८ साली फ्रान्सनं विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी किलियन एमबापेचा जन्मही झाला नव्हता. पण त्याच एमबापेनं फ्रान्सला पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून दिला आहे. विश्वचषकात आणि विश्वचषकाच्या फायनलमध्ये गोल करणारा एमबापे हा ब्राझिलचे महान फुटबॉलर पेले यांच्यानंतरचा सर्वात युवा खेळाडू ठरला. एमबापेची ही कामगिरी येणाऱ्या काळातही फ्रान्स फुटबॉलसाठी फारच निर्णायक असेल. या संपूर्ण विश्वचषकात एमबापेला साथ दिली ती अॅन्टॉइन ग्रिझमननं. ग्रिझमननंही विश्वचषकात चार गोल डागण्याचा पराक्रम गाजवला. तर मधल्या फळीतल्या पॉल पोग्बाची कामगिरीला नजरअंदाज करुन चालणार नाही. आपल्या संघाला गोल करण्याच्या अनेक संधी पोग्बानं निर्माण करुन दिल्या. फायनल सामन्यातला पोग्बाचा गोल तर कमालच होता.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा

फ्रान्सच्या विश्वचषक विजयाचं मुख्य श्रेय जातं ते प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांना. विश्वचषकाआधी देशॉ यांच्या संघनिवडीबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. कारण देशॉ यांनी करिम बेन्झामा, डिमित्री पायेट, अॅन्टोनी मार्शियल, लँगलेट, डिग्ने, लापोर्ते, बेन येडेर, लॅकाझेट, कोमॅन, रॅबियट, झुमा, बाकायोको, कुरझावा  अशा गुणवान खेळाडूंना संघात स्थान दिलं नव्हतं. पण देशॉ यांना आपण निवडलेल्या २३ खेळाडूंवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळं अगदी पहिल्या सामन्यापासून फ्रान्सनं दमदार कामगिरी बजावली. देशॉ यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला फ्रान्सच्या खेळाडूंनी कुठेही तडा जाऊ दिला नाही. अर्जेन्टिना, उरुग्वे आणि बेल्जियमसारख्या बलाढ्य संघांसमोर फ्रान्सच्या खेळाडूंनी बजावलेली कामगिरी ही खरोखरंच वाखण्याजोगी होती. हे सर्व शक्य झालं ते दिदिएर देशॉ यांच्या रणनितीमुळेच. ऑलिव्हियर जिरुडसारख्या खेळाडूला संपूर्ण विश्वचषकात एकही गोल करता आला नाही. तरीही देशॉ यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला. बचावफळीतल्या बेंजामिन पॅवार्ड, सॅम्युएल उमतिती आणि राफेल वरानसारख्या खेळाडूंनी फ्रान्ससाठी प्रत्येकी एकेक गोल डागला. त्यामुळं फ्रान्सच्या आक्रमणात कुठेही कमतरता जाणवली नाही.

दिदिएर देशॉ यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सनं १९९८ साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर यंदा प्रशिक्षक म्हणून फ्रान्सनं दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. दिदिएर देशॉ हे मारियो झगालो आणि फ्रांज बेकनबॉयर यांच्यानंतर एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकणारे आजवरचे तिसरेच व्यक्ती ठरले. मारियो झगालो यांनी १९५८ आणि १९६२ साली ब्राझिलकडून एक खेळाडू म्हणून विश्वचषक जिंकला होता. तर १९७० साली झगालो यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझिलनं विश्वचषकावर नाव कोरलं होतं. जर्मनीच्या फ्रांज बेकनबॉयर यांनी १९७४ साली खेळाडू म्हणून आणि १९९० साली जर्मनीचे प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.

दिदिएर देशॉ यांनी फ्रान्सच्या संघाचा मजबूत पाया रचला आहे. २०२२ सालच्या फिफा विश्वचषकाचा विचार केला तर फ्रान्सचा हाच संघ आपल्याला खेळताना दिसेल. कारण फ्रान्सच्या यंदाच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. ग्रिझमन आणि कान्ते हे २०२२ च्या विश्वचषकात तिशी ओलांडतील. पण फ्रान्सचे बहुतेक खेळाडू हे तिशीच्या आतच असतील. त्यामुळे देशॉ यांचा विश्वविजेता संघ हा भविष्यातही फ्रान्ससाठी सोनेरी कामगिरी बजावेल यात काही शंका नाही.

  • आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या इमेल आयडीवर पाठवा