वापरासाठी अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत तलवारीचे जगभरात विविध कालखंडात अनेक प्रकार अस्तित्वात होते. कापणे (कटिंग), खुपसणे (थ्रस्टिंग) आणि तोडणे (चॉपिंग) ही तलवारीची मुख्य कामे. त्यानुसार त्यांच्या रचनेतही फरक आढळतात. तलवारीचा विकास अभ्यासताना चिलखतांचाही संदर्भ लक्षात घ्यावा लागतो. कारण शस्त्रे आणि त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी वापरली जाणारी साधने यांचा सातत्याने आणि समांतर विकास होत होता.

प्राचीन रोमन योद्धय़ांच्या आखूड पण भक्कम आणि टोकदार ‘ग्लॅडियस’ तलवारी प्रसिद्ध होत्या. त्यावरूनच रोमन योद्धय़ांना ‘ग्लॅडिएटर्स’ हे नाव पडले. इजिप्तमध्ये विळ्याच्या आकाराच्या ‘खोपेश’ नावाच्या तलवारी प्रचलित होत्या. मॅशेट, ग्लॅडियस, शॉर्टस्वोर्ड या आखूड असत. लाँगस्वोर्ड, ब्रॉडस्वोर्ड, क्लेमोर, रेपियर या सरळ तलवारी असत. सेबर, समशेर, सिमिटार या बाकदार तलवारी होत्या. तर फल्शन, डाओ आदी टोकाला रुंद आणि तोडण्यास उपयुक्त तलवारी होत्या. भारतातही तलवार, समशेर, धोप, खांडा, पट्टीसा, दांडपट्टा, जमदाड, उरुमी असे तलवारींचे प्रकार होते. भारतीय तलवारी सहसा बाकदार असत. उरुमी हे दांडपट्टय़ासारखी अनेक लवचिक पाती एकत्र असलेले आणि वापरास अत्यंत कौशल्याची गरज असलेले भारतीय शस्त्र होते. दांडपट्टय़ाची परिणामकारकता घोडखिंडीच्या (पावनखिंड) लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांनी दाखवून दिली होती. युरोपीय धाटणीच्या सरळ तलवारी खुपसण्यास योग्य तर भारतीय बाकदार तलवारी तोडणे आणि कापण्यास अधिक योग्य होत्या. दांडपट्टा कापण्यात परिणामकारक होता.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
Pile of Dead fish, Airoli creek
ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ? 
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

शस्त्रांपासून बचाव करण्यास सुरुवातीला जाड कापड, चामडे आणि नंतर धातूच्या साखळ्यांच्या जाळीची (चेन मेल आर्मर) चिलखते वापरात आली. त्यांना भेदण्यासाठी अधिकाधिक जाडजूड, लांब आणि टोकदार तलवारी अस्तित्वात आल्या. पुढे जाळीच्या चिलखतावर धातूचे पत्रेही लावले जाऊ लागले. ते भेदण्यासाठी फल्शन, खांडा अशा तलवारी उपयोगी होत्या. त्यापुढे चिलखते इतकी जाडजूड आणि सर्वागाला झाकणारी बनली की काख, कंबर, मान आदी ठिकाणच्या फटींतून (गॅप) खुपसण्यासाठी तलवारी अधिक अरुंद आणि टोकदार बनल्या. त्यातूनच रेपियरचा जन्म झाला.

उत्तम दर्जाच्या तलवारी बनवणे ही एक कला होती. स्पेनमधील तोलेदो या शहराची ‘सिटी ऑफ स्टील अँड स्वोर्ड्स’ म्हणून ख्याती असून त्यासाठी या शहराला १९८६ साली युनेस्कोकडून जागतिक वारसा (वर्ल्ड हेरिटेज साइट) म्हणून दर्जा मिळाला आहे.

ख्रिस्तपूर्व पाचव्या-सहाव्या शतकातील भारतातील चेरा घराण्याच्या काळातील वुट्झ स्टील प्रसिद्ध होते. तमिळनाडूतील कोंडूमानल, तेलंगणमधील गोवळकोंडा आणि कर्नाटकात वुट्झ पोलादाच्या तलवारी बनवल्या जात. कन्नड भाषेत पोलादासाठी उक्कू (ukku) असा शब्द आहे. त्याचा इंग्रजी उच्चार वुक (wook)आणि त्याचा अपभ्रंश वुट्झ (wootz). या प्रकारच्या पोलादात कार्बनची मात्रा अधिक असल्याने त्याला ताकद येत असे. हे पोलाद पश्चिम आशिया, अरब जगत आणि युरोपमध्ये निर्यात होत असे. वुट्झ पोलादापासून बनवलेल्या भारतीय तलवारींची परिणामकारकता एका पर्शियन वाक्प्रचारातून प्रतित होते. त्याचे इंग्रजी रूप ‘टू गिव्ह अ‍ॅन इंडियन आन्सर’ असे आहे. म्हणजेच भारतीय तलवारीचा ‘प्रसाद’ देणे.

सचिन दिवाण – sachin.diwan@ expressindia.com