‘सर्व काय्रेषु सर्वदा’ अशी आराधना करीत ढोल-ताशांच्या गजरात करवीरनगरीत गणरायाचे शुक्रवारी आगमन जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला दाद देत शहरात डॉल्बीला फाटा देत भाविकांनी तसेच सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादाला प्राधान्य दिले.

पावसाची सर येत असतानाही भाविकांचा उत्साह कायम होता. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढल्याचे दिसून आले. आता दहा दिवस बाप्पांच्या उत्सवात अवघी नगरी दंग होईल.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

मंगलमूर्तीच्या आगमनाची तयारी गेली दोन आठवडे सुरू होती. आज सकाळपासूनच वाद्य आणि ढोल-ताशांच्या गजरात श्री गणेशाचे स्वागत झाले. शाहुपुरी कुंभार गल्ली, गंगावेस कुंभार गल्ली येथे विविध रूपांतील आकर्षक आणि सुबक गणेशमूर्ती उपलब्ध होत्या. शहरातील कुंभार गल्ली तसेच अन्य ठिकाणी श्री मूर्ती घेण्यासाठी आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती.

ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत मोठय़ा उत्साहात आणि चतन्यमय वातावरणात घराघरांत गणरायाचे आगमन झाले. मंडळांच्या श्रींच्या आगमनावेळीही कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व जण गणपती बाप्पांच्या जयघोषात मग्न झाले. धार्मिक आणि मंगलमय वातावरणात गणपती घराघरांत विराजमान झाले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

प्रशासन, सामाजिक संस्था यांच्याकडून डॉल्बी मुक्तीबरोबरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्न केले गेले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. पर्यावरणाचा आणि पाणी प्रदूषणाचा विचार करता लोकांमध्ये जागृती होत आहे. आज प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा शाडूच्या गणेशमूर्ती घेण्याकडे कल दिसून आला. गणेशमूर्ती पुरुषांनी आणायची या प्रथेत बदल करत  आज महिला आणि मुलींनी मूर्ती वाजतगाजत घरी आणल्या.

संस्थानिक वारसा

घरोघरी गणेशाचे आगमन होत असताना नव्या राजवाडय़ातसुद्धा गणेशोत्सवाची धूम सुरू होती.  भारतातील अनेक संस्थानांमध्ये आपल्या संस्थानिक परंपरा जपल्या जातात. करवीरनगरीच्या  छत्रपती घराण्याच्या गणपतीचेही पारंपरिक पद्धतीने आगमन झाले.

पारंपरिक वाद्यांचा गजर, भालदार, चोपदार, मानाचा अश्व, मानकरी अशा सर्व लवाजम्यासह गणरायाला पालखीतून राजवाडय़ाकडे नेण्यात आले. श्रीमंत शाहू महाराज, खासदार संभाजीराजे, मालोजीराजे यांच्यासह शाहू परिवाराने गणेशाची विधिवत पूजा करत परंपरेचे जतन केले.