News Flash

Video : कागदाच्या लगद्यापासून साकारला बाप्पा; लहान मुलंही पेलू शकतात वजन

या मंडळाने प्रदूषण मुक्त गणेशोत्सव हा केवळ विचार न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणला आहे

देशभरात गणशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. कलाकारांपासून ते सामान्य माणसांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. जागोजागी मंडळांचे गणपतीदेखील पाहायला मिळत आहेत. यंदा अनेक मंडळांनी इको फ्रेंडली डेकोरेशन आणि इकोफ्रेंडली बाप्पाची मूर्ती आणण्याचा प्रयत्न केला आहे. असाच एक प्रयत्न लक्ष्मणनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने देखील केला आहे. या मंडळाने पर्यावरणास हानिकारक प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती न आणता अगदी काही मिनिटांत विरघळणारी व एकदम हलकी पेपरपासून बनवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

गोरेगाव पूर्वमधील जायकोच लक्ष्मणनगर येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्रतिवर्षी उल्लेखनीय कार्य करीत आहे. जेष्ठांचा अनुभव व तरुणाईचा जोश यांचा अनोखा संगम असलेले हे मंडळ मागील ३५ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. पर्यावरणास हानिकारक प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती न आणता अगदी काही मिनिटात विरघळणारी व एकदम हलक्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. प्रदूषण मुक्त गणेशोत्सव हा केवळ विचार न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणून सदर मंडळाने आसपासच्या गणपती मंडळांना एक शिकवण दिली आहे.

गणेशोत्सवात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांना स्वतःच्या हाताने उचलून पाहता यावी अशी कागदी बाप्पाची मूर्ती मंडपात ठेवण्यात आली आहे. प्रत्येक भाविकाला विशेषतः लहान मुलांना देखील बाप्पा ही मूर्ती उचलण्याची संधी दिली जात आहे. हा बाप्पा उचलण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर गणेशभक्तांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत. दरम्यान अनेक भक्तांनी या मंडळाचे कौतुकही केले आहे. प्रत्येकजण पुढील वर्षी आपल्या घरी कागदी मूर्ती आणण्याचा संकल्प घेऊन मंडपाबाहेर पडत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 11:49 am

Web Title: eco friendly ganesh murti ganesh murti made by paper eco friendly bappa avb 95
Next Stories
1 VIDEO: पुणे – दगडूशेठ हलवाई गणपतीला १२७ लिटर दुधापासून तयार केलेला आईस्क्रीमचा मोदक अर्पण
2 पुढील पाच दिवस गर्दीचे
3 मुंबईत १६,४९२ गणपतींचे विसर्जन
Just Now!
X