सुवर्णसिंहासनविराजित पाच फुटी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंगळवारी भांडुपच्या नेपच्यून मॅग्नेट मॉलमध्ये करण्यात आली. ही सुवर्णमूर्ती घडवली आहे थायलंडमधील कारागिरांनी. ‘प्रांदा ज्वेलर्स’च्या थायलंड येथील शाखेत २४ कॅरेट सोन्याचा वापर करू न ती बनवण्यात आली आहे. ही मूर्ती घडवण्यासाठी तीन महिने लागले तर १६.६५ लाख रुपये खर्च आला आहे. ही मूर्ती घडवताना त्याला टू-डी आणि थ्री-डी इफेक्टही देण्यात आला आहे. गणेशोत्सवात पाच दिवस या मूर्तीची पूजा करण्यात येणार आहे. २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबपर्यंत या मूर्तीचा मुक्काम मुंबईत असणार आहे. त्यानंतर ही गणेशमूर्ती कोलकात्त्यात जाणार आहे.