News Flash

रात्रीच्या मानाच्या गणेशांच्या मिरवणुका दिमाखात

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, जिलब्या मारुती मंडळाच्या वैभवशाली मिरवणुकीने रंगत आणली.

धक्काबुक्की अन् कुचंबणा.. त्यांच्यासाठी नेहमीचीच!

गर्दीतील धक्काबुक्की, कुचंबणा, हेळसांड, तर कधी पोलिसांची लाठी.. हे गर्दीतील सामान्य नागरिकसाठी नेहमीचेच, तरीही तो या वैभवशाली उत्सवाचा वर्षांनुवर्षे भाग होतो आहे.

राजकीय घोषवाक्याच्या साक्षीने श्रींचे विसर्जन

लातूर येथील गणपती विसर्जनाची मिरवणूक राजकीय घोषवाक्यांनी भलतीच गाजली. ‘अलविदा महापौर’ पासून ते थेट आमदार अमित देशमुखांच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे फलक मिरवणुकीत होते.

उस्मानाबादेत श्रींच्या मिरवणुकीत ‘झेंडा’ नाच

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत उस्मानाबाद शहरात राजकीय नेत्यांचा झेंडा नाच चांगलाच रंगला. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीपूर्वी मिसळता यावे म्हणून राष्ट्रवादीचे माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील झेंडा घेऊन उतरले.

जालना शहरात श्री विसर्जन मिरवणूक उत्साहात

जालना शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणूक रात्रभर चालली. सायंकाळी साडेअकराच्या सुमारास सुरू झालेल्या मिरवणुकीस मामा चौकातून प्रारंभ झाला. मिरवणुकीत ७६ सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी झाली होती.

‘गणपतीबाप्पा मोरया’ च्या गजरात विघ्नहर्त्यांला निरोप

गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; अशा गजरात जिल्ह्यातल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत झालेल्या विसर्जनादरम्यान कुठल्याही अनुचित घटनेची नोंद झाली नाही.

निरोप घेतो आता.!

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विघ्नहर्त्यां गणरायाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने सोमवारी समुद्र किनारे, तलाव आणि कृत्रिम तलावांवर होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी

गणरायाला निरोपास मराठवाडय़ात सज्जता

गणरायाला निरोप देण्यासाठी मराठवाडा सज्ज झाला असून, सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. या निमित्त चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

लक्ष्मी, टिळक, कुमठेकर, बाजीराव, केळकर, शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून विसर्जन मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष राहणार आहे.

सकाळी साडेदहाला विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

‘गणपती बाप्पा मोरया’ चा गजर करीत लाडक्या गणरायाला सोमवारी (८ सप्टेंबर) भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.

गणेशोत्सवाने अनुभवली उत्सवी गर्दी

पावसाने घेतलेली विश्रांती आणि रविवारच्या सुट्टीआधीचा दिवस असा दुहेरी लाभ घेत सहकुटुंब घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या गर्दीने शनिवारची रात्र जागवून काढली.

लोकसत्ता गणेशउत्सव मूर्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धेला यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.

लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धेतील ‘मुंबईचा राजा’ आणि अन्य विभागातील विविध नामांकने

लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धेत ‘मुंबईचा राजा’ ठरणाऱ्या मंडळाला ५१,००१ रुपयांचे रोख पारितोषिक मानचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे.

उत्सवी गर्दीवर डेंग्यूचे सावट

लांबलेल्या पावसाच्या दमदार आगमनासह प्रारंभ झालेल्या गणेशोत्सवातील आकर्षक देखाव्यांना यंदा दर्शकांच्या घटलेल्या गर्दीला सामोरे जावे लागले. दरवर्षी दिसणारा देखाव्यांच्या गर्दीचा नजारा या वर्षी मात्र अभावानेच पाहावयास मिळाला.

माळीण दुर्घटनेतून धडा घेण्याचा मंडळांद्वारे संदेश

गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप बदलले आहे. देखाव्याच्या माध्यमातून भव्यता जपण्यासाठी मंडळांकडून वर्गणीच्या नावे बक्कळ पैसा संकलित केला जातो.

बिया व वृक्ष संवर्धन कायद्याचा!

नाना पेठेतील एका मंडळाने पर्यावरणावर आधारित देखावा सादर केला असून, गणपतीच्या प्रसादासोबत वृक्षांच्या बिया आणि वृक्ष कायद्याची पुस्तिका असा पर्यावरणीय प्रसादही वाटला जात आहे.

ढोल-ताशांचा गजर आणि थिरकणारी पावले..

गणेशोत्सवाचे आगमन, विसर्जन असो की कुठलीही मिरवणूक, ढोल ताशांच्या आवाजाच्या तालावर धुंद होऊन नाचणारे गणेश मंडळांचे कार्यकर्ते.. असे चित्र दरवर्षीच बघायला मिळत असते.

बाप्पा.. पुन्हा माळीण दुर्घटना नको

पुण्यातील माळीण गावात जुलै महिन्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संपूर्ण महाराष्ट्र दु:खाच्या खाईत लोटला. या दुर्घटनेनंतर अनेक सामाजिक संघटनांनी माळीण येथील ग्रामस्थांना मदतीचा हात दिला.

पनवेलचा इको बाप्पा आजीआजोबांचे महत्त्व पटवून देतोय

पनवेल शहरातील टपाल नाका येथील श्री गणेश मित्र मंडळाचा इको फ्रेंडली बाप्पा सध्या पनवेलच्या गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

पुढच्या वर्षी लवकर या..

सात दिवस भक्तांकडे पाहुणचार घेऊन घरी निघालेल्या लाडक्या गणपतीला निरोप द्यायला मुंबईच्या विसर्जन तलाव आणि किनाऱ्यांवर भक्तांची गर्दी उसळली होती.

रत्नागिरीत गणेशोत्सव शांततेत

गेल्या शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी विराजमान झालेल्या जिल्ह्य़ातील १ लाख १७ हजार बाप्पांना आज अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला.

रायगडात ५४ हजार गौरी-गणपतींचे विसर्जन

रायगड जिल्ह्य़ात ५४ हजार गौरी-गणपतींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशाच्या गजरात वाजतगाजत गौरी-गणपतींना निरोप देण्यात आला.

सिंधुदुर्गात इच्छुक उमेदवारांची गणेशदर्शनाला सुरुवात!

विधानसभा निवडणूक आचारसंहिता केव्हाही लागणार असल्याने निवडणूक रिंगणात उभे राहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने गणेश दर्शन घेतले.

सर्वधर्मसमभाव जपणारे मनमाडचे युवक क्रांती मंडळ

‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा सर्वपरिचित असली तरी त्याचे अनुकरण प्रत्यक्षात करणेही तितकेच महत्त्वाचे.

Just Now!
X