आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणारा ड्वेन ब्रावो सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ब्रावो टीव्ही सीरिज इन्साइड एजची अभिनेत्री नताशा सूरीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी नताशा आणि ब्रावोला एका कॉफी शॉपमध्ये काही निवांत क्षण घालवताना पाहण्यात आले. याशिवाय चेन्नईच्या अनेक सामन्यांमध्ये नताशा ब्रावोला चिअर करताना दिसते. २००६ मध्ये नताशाने मिस इंडियाचा किताब पटकावला होता. या दोघांना याबद्दल विचारले असता आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असेच ते सांगत आहेत.

काही महिन्यांपूर्वीच ब्रावोचे ब्रेकअप झाले होते. अनेक दिवसांपासून तो रेजिमा रामजितला डेट करत होता. तर नताशा सुरीचा काही दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. इंडोनेशियामध्ये नताशा एका ब्रँड स्टोअरच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणी म्हणून गेली होती. स्टोअरच्या उद्घाटनानंतर नताशा इंडोनेशियात मजा मस्ती करण्यासाठी काही काळ थांबली. यावेळी तिने बंजी जंपिंग करण्याचे ठरवले. पण बंजी जम्पिंग करत असताना दोरी मधून तुटली ज्यामुळे नताशाचा तोल गेला आणि डोकं पालथ्या अवस्थेत ती जलाशयात कोसळली होती. पण आता ती पूर्ण बरी झाली असून चेन्नईचे अनेक सामने ती स्टेडिअममध्ये जाऊन बघण्यास प्राधान्य देते.

आतापर्यंत नताशाने ६०० हून जास्त फॅशन शो केले आहेत. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. २०१६ मध्ये तिने ‘किंग लायर’ या मल्ल्याळम सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. नताशा आगामी ‘बा बा ब्लॅक शिप’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत मनिष पॉल, अनू कपूर आणि अनुपम खेर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.