यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणा-या ख्रिस गेलने आज महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. केवळ २२ चेडूंमध्ये गेलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ३३ चेंडूंमध्ये गेलने ६३ धावांची धडाकेबाज खेळी केली. अखेर शेन वॉट्सनने गेलला इम्रान ताहीरकरवी झेलबाद केले. गेलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईपुढे 198 धावांचे आव्हान ठेवले आहे.

दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर अत्यंत रोमहर्षक सामन्यात विजय मिळवल्यानंतर चेन्नईने दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबला मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पराभूत केले. पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सला सात गड्यांनी पराभूत केले होते.

दोन्ही संघ

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, जगदीशन नारायण, मिचेल सँटनर, दीपक चहार, के.एम. आसिफ, लुंगी एनगिडी, कनिष्क सेठ, ध्रुव शौरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्स, मार्क वूड, क्षितीज शर्मा, मोनू सिंग, चैतन्य बिश्नोई.

किंग्ज इलेव्हन पंजाब :आर. अश्विन (कर्णधार), आरोन फिंच, डेव्हिड मिलर, करुण नायर, मनोज तिवारी, मयांक अगरवाल, अक्षर पटेल, ख्रिस गेल, मंझूर दार, मार्कस स्टॉइनिस, प्रदीप साहू, युवराज सिंग, अक्षदीप नाथ, लोकेश राहुल, अॅड्रू टाय, अंकित राजपूत, बरिंदर सरन, बेन ड्वारशस, मयांक डागर, मोहित शर्मा, मजीब उर रेहमान.