आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळाडूंच्या दुखापतीचं सत्र सुरुच आहे. रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सनराईजर्स हैदराबाद संघासमोर आणखी एक संकट निर्माण झालं आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार यंदा दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात खेळत असताना भुवनेश्वरला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला १९ वं षटक पूर्ण टाकता आलं नाही.

अवश्य वाचा – IPL 2020 : राशिद खानची बातच न्यारी ! शारजाच्या मैदानात ४ षटकांत दिल्या फक्त २२ धावा

ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना संघातील सूत्रांनी भुवनेश्वरच्या माघार घेण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. “भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. संघाचा प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे याचा फटका नक्कीच बसणार आहे. परंतू संघ यामधून नक्कीच सावरेल.” चेन्नईविरुद्ध सामन्यात दुखापत झाल्यानंतर मुंबईविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर खेळू शकला नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने भुवनेश्वरच्या दुखापतीबद्दल माहिती देताना, तो पुढचे काही सामने खेळू शकणार नाही अशी माहिती दिली होती.

परंतू झालेली दुखापत लक्षात घेता भुवनेश्वरने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रानेही बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : बोटाला झालेल्या दुखापतीमुळे अमित मिश्राची स्पर्धेतून माघार