IPL 2020 DC vs KXIP: सलामीच्या सामन्यात मुंबईच्या संघाला चेन्नईने पराभूत केले. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी या दोन अनुभवी कर्णधारांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. पण दुसऱ्या सामन्यात मात्र दोन नव्या दमाच्या कर्णधारांमधील लढत चाहत्यांना अनुभवायला मिळाली. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यातील सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या काही षटकांमध्ये त्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. या दरम्यान, मैदानावर काहीसा गोंधळ पाहायला मिळाला.

दिल्लीच्या संघाचे पहिले ३ गडी झटपट बाद झाले. पृथ्वी शॉसोबत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात झालेल्या गोंधळामुळे शिखर धवन माघारी परतला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सलामीवीर पृथ्वी शॉ देखील ५ धावा काढून बाद झाला. तर पाठोपाठ शिमरॉन हेटमायरही ७ धावा काढून बाद झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था ३ बाद २२ होती. त्यानंतर ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. श्रेयस अय्यरने कृष्णप्पा गौतमच्या दोन चेंडूवर दोन षटकार खेचले.

पहिला षटकार-

दुसरा षटकार-

दमदार फटकेबाजी करत खेळतानाच नंतर श्रेयस अय्यर बाद झाला. अय्यरने ३ षटकारांसह ३२ चेंडूत ३९ धावा केल्या. पाठोपाठ ऋषभ पंतदेखील बाद झाला. पंतने २९ चेंडूत ३१ धावा केल्या. पंतला मात्र डावात एकही एकही षटकार लगावता आला नाही.