27 November 2020

News Flash

IPL 2020 : बेंगळूरुच्या मार्गात हैदराबादचा अडथळा

बाद फेरी गाठण्यासाठी बेंगळूरुचा संघ उत्सुक

(संग्रहित छायाचित्र)

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

गेल्या दोन लढतींत पराभव पत्करला असला कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला अद्यापही इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीतील स्थान पक्के करण्याची संधी आहे. यासाठी त्यांना शनिवारी सायंकाळी होणाऱ्या लढतीत धोकादायक सनरायजर्स हैदराबादचा अडथळा ओलांडावा लागेल.

यंदाच्या हंगामात आतापर्यंत फक्त मुंबई इंडियन्सने १६ गुणांसह बाद फेरीतील स्थान पक्के केले असून बेंगळूरुने १२ सामन्यांतून १४ गुण कमावले आहेत. त्यामुळे हैदराबादविरुद्ध विजय मिळवून दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीपूर्वीच बाद फेरी गाठण्यासाठी बेंगळूरुचा संघ उत्सुक आहे.  युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल बेंगळूरुसाठी सातत्याने योगदान देत असून कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांची साथ त्याला लाभणे गरजेचे आहे. गोलंदाजीत नवदीप सैनीच्या दुखापतीबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 12:19 am

Web Title: ipl 2020 hyderabad obstacle on the way to bangalore abn 97
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : दिल्लीपुढे मुंबईचे आव्हान
2 Video : एका धावेने हुकलं शतक, संतापलेल्या गेलने मैदानातच फेकली बॅट
3 IPL 2020 : नाद करा पण…ख्रिस गेलचा ‘भीमपराक्रम’, टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार षटकारांची नोंद
Just Now!
X