25 January 2021

News Flash

दिल्लीचा विजय अन् मुंबईची घसरण, पहा कोण आहे कोणत्या स्थानावर

IPL 2020 Points Table

शारजाच्या मैदानात झालेल्या राजस्थानविरूद्धच्या सामन्यात दिल्ली संघाने ४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दिल्ली संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. तर पहिल्या स्थानावर असणाऱ्या मुंबईच्या संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. पाच विजय आणि दहा गुणांसह दिल्ली पहिल्या स्थानावर आहे. तर ८ गुणांसह मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सध्या सहाव्या स्थानावर आहे. सहा सामन्यात चेन्नईचे दोन विजय आणि चार पराभव झाले आहेत. आजच्या पराभवानंतर दणक्यात सुरुवात करणारा राज्यस्थानचा संघ सातव्या स्थानावर पोहचला आहे तर पंजाबचा संघ तळाशी आहे. पाहुयात यंदाच्या हंगामातील २३ व्या सामन्यानंतर गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानी आहे .

संघ  सामने विजय पराभव नेट रनरेट गूण
दिल्ली कॅपिटल्स +1.267 १०
मुंबई इंडियन्स +1.488
सनराईजर्स हैदराबाद +0.232
कोलकाता नाईट रायडर्स +0.002
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु -1.355
चेन्नई सुपरकिंग्ज -0.371
राजस्थान रॉयल्स -1.073
किंग्ज इलेव्हन पंजाब -0.431

शनिवार आणि रविवार डबल डेकर (दिवसातून दोन सामने) सामने असल्यामुळे गुणतालिकेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पण सध्याच्या घडीला दिल्लीचा संघ पहिल्या स्थानावर तर पंजाबचा संघ ८ व्या स्थानावर आहे.

 

आयपीएलच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 11:59 pm

Web Title: ipl 2020 ipl 2020 points table after delhi capitals vs rr match nck 90
टॅग IPL 2020
Next Stories
1 Video: हेटमायरने टिपलेला स्मिथचा अफलातून झेल पाहिलात का?
2 Video: ‘गब्बर’ स्पेशल! बटलरने बॅट फिरवल्यावर धवनने घेतली झेप अन्…
3 IPL 2020: विकृतीचा कळस; पराभवानंतर धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी
Just Now!
X