News Flash

IPL 2020 MI vs RCB: मुंबईचा ‘सूर्य’ तळपला! ‘विराटसेने’चा केला दणदणीत पराभव

मुंबई १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल

Dream11 IPL 2020 MI vs RCB: सूर्यकुमार यादवने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने बंगळुरूवर ५ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या संघाने १६४ धावांपर्यंत मजल मारली होती. देवदत्त पडीकलने दमदार अर्धशतक ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली होती. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत नाबाद ७९ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईने १६ गुणांसह तालिकेत अव्वलस्थान पटकावले.

सूर्यकुमारची तेजस्वी खेळी…

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूचे सलामीवीर देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी दमदार सुरूवात केली. जोशुआ फिलिप २४ चेंडूत ३३ धावा काढून माघारी परतला. कर्णधार विराट कोहलीही ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात डीव्हिलियर्स (१५) झेलबाद झाला. पाठोपाठ शिवम दुबेही तंबूत परतला. पण खेळपट्टीवर स्थिरावलेल्या देवदत्त पडीकलने दमदार ७४ धावा केल्या. त्याने ४५ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकार खेचत ७४ धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर संघाने १६४पर्यंत मजल मारली. बुमराहने ३ तर बोल्ट, राहुल चहर आणि पोलार्डने १-१ बळी टिपला.

पडीकलचं दमदार अर्धशतक…

बुमराहचा भेदक मारा…

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक १८ धावांवर झेलबाद झाला. इशान किशनला चांगली सुरूवात मिळाली पण मोठा फटका खेळताना तो २५ धावांवर बाद झाला. धावगतीचा विचार करत सौरभ तिवारीही मोठा फटका खेळताना ५ धावा काढून माघारी परतला. पाठोपाठ कृणाल पांड्याही १० धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याने १७ धावा केल्या. पण सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरत धडाकेबाज अर्धशतक ठोकलं. त्याने ४३ चेंडूत नाबाद १० चौकार आणि ३ षटकार खेचत ७९ धावा केल्या. बंगळुरूकडून युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराजने २-२ तर ख्रिस मॉरिसने १ बळी टिपला.

Live Blog
23:01 (IST)28 Oct 2020
मुंबईचा 'सूर्य' तळपला! 'विराटसेने'ला नमवून प्ले-ऑफ्समध्ये प्रवेश

सूर्यकुमार यादवने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने बंगळुरूवर ५ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या संघाने १६४ धावांपर्यंत मजल मारली होती. देवदत्त पडीकलने दमदार अर्धशतक ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली होती. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत नाबाद ७९ धावा केल्या आणि संघाला प्ले-ऑफ्सचं तिकीट मिळवून दिलं.

22:33 (IST)28 Oct 2020
सूर्यकुमार यादवचं धडाकेबाज अर्धशतक

सूर्यकुमार यादवने फटकेबाजी सुरूच ठेवत २९ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक झळकावलं.

22:27 (IST)28 Oct 2020
कृणाल पांड्या बाद; मुंबईला चौथा धक्का

फलंदाजीत बढती मिळालेला कृणाल पांड्या बाद मोठा फटका खेळताना १० धावांवर माघारी परतला.

22:12 (IST)28 Oct 2020
सौरभ तिवारी बाद; पडीकलचा अप्रतिम झेल

धावगतीचा विचार करत सौरभ तिवारीने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर हवेत फटका लगावला. पण फटक्याचा अंदाच चुकल्याने चेंडू फारसा लांब जाऊ शकला नाही. त्याचवेळी देवदत्त पडीकलने पुढच्या दिशेने झेप घेत अप्रतिम झेल टिपला. तिवारीने केवळ ५ धावा केल्या.

21:58 (IST)28 Oct 2020
इशान किशन माघारी; मुंबईला दुसरा धक्का

इशान किशनला चांगली सुरूवात मिळाली पण मोठा फटका खेळताना तो २५ धावांवर बाद झाला. त्याच्या खेळीत ३ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता.

21:50 (IST)28 Oct 2020
डी कॉक झेलबाद; सिराजला पहिलं यश

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक स्वस्तात झेलबाद झाला. १९ चेंडूत त्याला केवळ १८ धावा करता आल्या.

21:12 (IST)28 Oct 2020
पडीकलची एकाकी झुंज; मुंबईपुढे १६५ धावांचे आव्हान

मुंबईविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या संघाने १६५ धावांपर्यंत मजल मारली. देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी डावाला दमदार सुरूवात करून दिली होती. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी साफ निराशा केली. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ३ बळी टिपत बंगळुरूच्या धावगतीला चाप लावला. देवदत्त पडीकलने एकाकी झुंज देत ४५ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. पण बंगळुरूच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही.

20:54 (IST)28 Oct 2020
पडीकल ७४ धावांवर झेलबाद; बंगळुरूच्या डावाला गळती

त्याच षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेल्या देवदत्त पडीकललाही बुमराहने ७४ धावांवर झेलबाद करवले. त्यानंतर बंगळुरूच्या डावाला गळती लागली.

20:48 (IST)28 Oct 2020
शिवम दुबे माघारी; बंगळुरूला चौथा धक्का

जसप्रीत बुमराहने बाऊन्सर चेंडू टाकत शिवम दुबेला २ धावांवर माघारी धाडलं.

20:43 (IST)28 Oct 2020
डीव्हिलियर्स मोक्याच्या क्षणी झेलबाद

शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात डीव्हिलियर्स झेलबाद झाला. अंगावर आलेला चेंडू तो सीमापार पोहोचवू शकला नाही. पोलार्डने त्याला १५ धावांवर माघारी धाडलं.

20:25 (IST)28 Oct 2020
किंग कोहली’ स्वस्तात माघारी; बंगळुरूला दुसरा धक्का

कर्णधार विराट कोहली चांगली कामगिरी करू शकला नाही. बुमराहने टाकलेल्या उसळत्या चेंडूवर विराट ९ धावा काढून झेलबाद झाला. या विकेटसह IPL कारकिर्दीत बुमराहचे १०० बळी पूर्ण झाले.  

20:22 (IST)28 Oct 2020
देवदत्त पडीकलचं धडाकेबाज अर्धशतक

देवदत्त पडीकलने फटकेबाजी सुरू ठेवत ३० चेंडूत धडाकेबाज अर्धशतक साजरं केलं.

20:08 (IST)28 Oct 2020
दमदार सुरूवातीनंतर बंगळुरूला पहिला धक्का

दमदार सुरूवातीनंतर बंगळुरूला आठव्या षटकात पहिला धक्का बसला. जोशुआ फिलिप २४ चेंडूत ३३ धावा काढून माघारी परतला. 

20:01 (IST)28 Oct 2020
बंगळुरूच्या सलामीवीरांचा 'पॉवर-प्ले'; केली दमदार सुरूवात

बंगळुरूचे सलामीवीर देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी पॉवर-प्लेच्या षटकांमध्ये दमदार सुरूवात करत अर्धशतकी (५४) भागीदारी केली.

19:35 (IST)28 Oct 2020
बंगळुरूच्या संघात ३ बदल...

अनुभवी गोलंदाजाला मिळाली 'कमबॅक'ची संधी...

19:33 (IST)28 Oct 2020
मुंबईची पलटण...

मुंबईच्या संघात बदल नाही..

19:32 (IST)28 Oct 2020
नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम गोलंदाजी

बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यातही रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून कायरन पोलार्ड संघाचं नेतृत्व करत आहे.

टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : एक हंगाम खराब गेल्यामुळे धोनी लगेच वाईट कर्णधार ठरत नाही – अंजुम चोप्रा
2 Video: नाचोsssss दुबईमध्ये ‘टीम इंडिया’च्या महिलांचा भन्नाट डान्स
3 IPL 2020 : RCB विरुद्ध सामन्यात संघात मोठ्या बदलांची गरज नाही – जसप्रीत बुमराह
Just Now!
X