मुंबईविरुद्ध सलामीचा सामना जिंकल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाला लागोपाठ दोन सामन्यांत पराभव स्विकारावा लागला. दरम्यानच्या काळात चेन्नईच्या संघाला सोशल मीडियावर खराब कामगिरीमुळे टीकेचं धनी व्हायला लागलं. मात्र आपल्याला मिळालेल्या आठवडाभराच्या विश्रांतीचा चेन्नईने पुरेपूर फायदा घेतला आहे. सनराईजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने धडाकेबाज सुरुवात केली. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अवश्य पाहा – जाणून घ्या सर्वाधिक IPL सामने खेळलेले खेळाडू, धोनी अव्वल स्थानावर

चेन्नईकडून दीपक चहरने डावाची सुरुवात केली. हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला पहिल्या चेंडूपासूनच चहरने अडचणीत आणायला सुरुवात केली. यानंतर चौथ्या चेंडूवर दीपक चहरच्या भन्नाट इनस्विंगवर बेअरस्टो पूर्णपणे फसला आणि क्लिन बोल्ड होऊन माघारी परतला. पाहा दीपकचा हा भन्नाट चेंडू…

दरम्यान, हैदराबादविरुद्ध सामन्यात चेन्नईने संघात ३ बदल केले. अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो आणि शार्दुल ठाकूर यांना संघात स्थान दिलं आहे. मुरली विजय, जोश हेजलवूड आणि ऋतुराज गायकवाड यांना चेन्नईने हैदराबादविरुद्ध सामन्यात विश्रांती दिली.