आयपीएल असो किंवा टी-२० क्रिकेट प्रत्येक फलंदाज आपली बॅटींग स्टाईल इंप्रूवाईज करुन वेगवेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. आयपीएलच्या तेराव्या हंगामात सनराईजर्स हैदराबादच्या जॉनी बेअरस्टोने फलंदाजीदरम्यान आपल्या कौशल्याने स्कूप शॉट खेळत बॉलला थेट सीमारेषेबाहेर पाठवलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला १६३ धावांवर रोखल्यानंतर हैदराबादने चांगली सुरुवात केली. परंतू कर्णधार डेव्हिड वॉर्नर उमेश यादवच्या गोलंदाजीवर विचीत्र पद्धतीने धावबाद झाला.

यानंतर जॉनी बेअरस्टोने मनिष पांडेच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. उमेश यादवच्या गोलंदाजीवर ९ व्या षटकात बेअरस्टोने एका पायावर बसत लेग साईडला जाणाऱ्या बॉलला हलकासा टच देत स्कूप शॉट खेळला. महत्वाची गोष्ट म्हणजे हा बॉलही थेट सीमारेषेबाहेर गेला. बेअरस्टोच्या या षटकाराचं समालोचकांनीही कौतुक केलं. पाहा हा भन्नाट शॉट…

त्याआधी हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन करत अखेरच्या षटकांमध्ये भेदक मारा केला. ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १६३ धावांपर्यंत मजल मारु शकला.