News Flash

IPL 2020: रैना माघार घेणार हे आधीच माहिती होतं? क्रिकेटपटूचं ट्विट व्हायरल

पाहा नक्की काय केलं होतं ट्विट

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन मुद्दे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आधी चेन्नईच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली. त्यानंतर रैनाने IPL 2020मधून माघार घेतली. दोन दिवसांनी त्याच्या माघारीचं कारण वादग्रस्त असल्याचं समोर आलं. धोनी आणि त्याच्यात हॉटेल रूमवरून वाद झाले असं CSKच्या मालकांनी मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्या माघारीबद्दल अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. तशातच एका क्रिकेटपटूचं जुनं ट्विटदेखील चर्चेत आलं आणि रैना माघार घेणार हे त्याला माहिती होतं की काय अशी चर्चादेखील सोशल मीडियावर रंगली.

इंग्लंडमध्ये २०१९च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी गोलंदाज जोफ्रा आर्चर याचे काही ट्विट्स चर्चेचा विषय ठरले होते. या स्पर्धेनंतरही जोफ्राचे काही जुने ट्विट्स पुन्हा व्हायरल झाले आणि त्याचा वर्तमानकाळात घडत असलेल्या गोष्टींशी संबंध लावण्यात आला. तसाच प्रकार आतादेखील घडला आहे. रैनाने घेतलेली माघार आणि आर्चरचे दोन ट्विट यांचा संबंध लावण्यात नेटिझन्सकडून मजेशीर पद्धतीने संबंध लावण्यात आला आहे. “रैना, पळू नकोस” आणि “रैना आऊट (बाहेर) कसा?” असे दोन ट्विट नव्याने व्हायरल झाले. त्याचसोबत सोशल मीडियावर आर्चरला रैना माघार घेणार हे माहिती होतं का? अशी चर्चाही नेटिझन्समध्ये रंगली.

पाहा ती दोन ट्विट्स…

दरम्यान, १ सप्टेंबरला रैनाने पंजाब पोलिसांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून त्याच्या काकांच्या कुटुंबाबत झालेल्या प्रकरणाबाबत मदत मागितली. चेन्नईच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याला ‘खचून जाऊ नको. आम्ही तुझ्यासोबत आहोत’, असा संदेशही देण्यात आला. त्यानंतर, “CSK माझं कुटुंब आहे. धोनी माझ्यासाठी खूप जवळची आणि महत्त्वाची व्यक्ती आहे. मी भारतात आल्याने सध्या क्वारंटाइन असलो तरीही माझा क्रिकेटचा सराव सुरू आहे. कुणी सांगावं… कदाचित मी तुम्हाला पुन्हा एकदा CSKच्या कॅम्पमध्येही दिसेन”, असेही रैना म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 3:22 pm

Web Title: suresh raina ipl 2020 csk england pacer jofra archer tweet goes viral after exit vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : हरभजन सिंहची स्पर्धेतून माघार, CSK संघासमोरची चिंता वाढली
2 IPL 2020 : कॉमेंट्री पॅनलमध्ये संजय मांजरेकरना स्थान नाही
3 VIDEO: हिटमॅन Reloaded! पाहा रोहितची तुफान फटकेबाजी
Just Now!
X