प्रस्तुत चित्रामध्ये उमाकांत कानडे यांनी घनदाट जंगलातील वातावरणाची निर्मिती केवळ कृष्णधवल रेखांकनाच्या माध्यमातून केली आहे. हे रेखांकन ज्या बारकाईने केले आहे, त्यातून जंगलाचा फील रसिकांना नेमका मिळतो. तर त्यातील लहानशा पक्ष्यांनी ते चित्र जिवंत केले आहे. त्यासाठी त्यांनी अगदी माफक रंगांचा चांगला वापर केला आहे. त्यातही काळ्यापांढऱ्या रेखांकनाच्या पाश्र्वभूमीवर माफक रंगांचा वापर केलेले पक्षी उठून दिसतात. पोत, रंगांचा, माफक वापर, चांगली चित्रचौकट या सर्वच निकषांवर चित्र आनंददायी ठरते. खरे तर आधुनिक चित्रकलेच्या मानाने हे ढोबळ चित्र आहे, पण रसिकांना ते आनंद देण्याची क्षमता राखते एवढे मात्र निश्चित!