मला माझे पूर्वज पुरेसे माहिती नव्हते, कारण विस्कळीतपणा आणि बेधुंद देशस्थी अजागळपणाचा शाप असलेल्या एका ओबडधोबड कुटुंबात माझा जन्म झाला. आम्हाला फक्त वर्तमान होता. भूतकाळाची सजग जाणीव कुणालाच नव्हती. कुटुंबाची काही काळापूर्वी असलेली सुबत्ता संपून गेली होती. माझे आई-वडील साधे, भांबावलेले नवे जोडपे म्हणून कुटुंब सांधायला उभे राहिले. आमच्या आजोबांनी बांधलेल्या भल्यामोठय़ा घराची शाकारणी करायची वेळ आली की आर्थिकदृष्टय़ा या नव्या जोडप्यावर प्रचंड ताण येत असे. आम्ही ज्याला ‘लोअर मिड्ल क्लास’ म्हणतात, ते लोक होतो. पण आम्हाला या संज्ञा माहिती नव्हत्या, आणि करूनही घ्यायच्या नव्हत्या.

आपण कोण आहोत, कुठले आहोत, याचा नेटका विचार करून आमच्या मनात आपल्या भूतकाळाविषयी अभिमान निर्माण करीत बसायला माझ्या आई-वडिलांना वेळ नव्हता. त्यांना जगणे महत्त्वाचे होते.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

अशा परिस्थितीत आम्हाला जातीची जाणीव घरातून करून दिली गेली नाही. कारण जात आम्हाला मदत करणार नव्हती. ते दिवस फार पूर्वीच संपले होते. जातीची जाणीव स्वयंपाकाच्या फरकातून होत असे. आपल्याकडे अशी फोडणी देतात, तर त्यांच्यात तशी देतात. आपल्याकडे असे ताट वाढत नाहीत, त्यांच्यात काळा मसाला फार असतो.. एवढेच उल्लेख केले जात. पाककला आणि पाकक्रिया या दोन प्रांतांपलीकडे जातींतला फरक घरामध्ये उल्लेखला जात नसे. तरी आमचे घर हे कुटुंबाचे मध्यवर्ती घर होते. घरात तिन्ही त्रिकाळ व्रतवैकल्ये आणि सणवार होत असत. ती आमची सोपी इको-सिस्टीम होती. त्याबद्दल उरबडवा अभिमान नव्हता की उगाच भारावून जाणे नव्हते.

आपला आपल्या जातीमुळे प्रचंड द्वेष करणारे लोक आपल्या शहराच्या सीमेबाहेर टपून बसले आहेत, ही जाणीव न आम्हा मुलांना होती, ना कष्ट करून घर चालवणाऱ्या माझ्या आई-वडिलांना होती. आपला द्वेष कुणी कशाला करील? आमचे लहानसे जग होते.

माझ्या आईच्या स्वप्नात पांढरी साडी नेसलेली एक विधवा बाई नेहमी यायची. ती आईला वारंवार शाप द्यायची की, तुमचा वंश संपेल. कुटुंबाचा प्रवास आटून जाईल. मला ती बाई पाहायची होती. पण दुसऱ्याच्या स्वप्नात असे कसे शिरणार आपण? ती बाई कधीतरी माझ्या स्वप्नात यावी असे मला वाटे. आई मला सांगत असे, की पूर्वी पणजोबांनी संस्थानात करवसुली अधिकारी असताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या आणि अनेक गरीब माणसांना त्रास दिला. त्या माणसांचे तळतळाट आपल्यामागे येत आहेत.

पण मी देवाचे नीट करते. मी तुम्हा मुलांना ते शाप लागू द्यायची नाही. तुम्ही सुरक्षित राहाल.

त्या जमिनी आता राहिल्या नव्हत्या. आमच्यापर्यंत पोचल्या नव्हत्या. कुठे गेल्या, कळत नव्हते. पण पणजोबांनी असे करायला नको होते असे वाटत राही. पणजोबांचा एक देखणा जुना फोटो घरात होता. ताठ बसलेले. हाताची घडी घालून. गजाननबुवा जोशींकडे ते गाणे शिकत. त्यांच्याकडून माझ्या धाकटय़ा भावाकडे गाणे चालत आले आहे असे सगळे म्हणत. ‘त्या जमिनी कुठे गेल्या?’ मी बाबांना विचारले, तर म्हणाले, ‘कूळ कायदा आला आणि आपले सगळे गेले. आपण आपल्या पूर्वजांच्या पापांचे देणे देऊन बसलो आहोत. आपण ते फेडले आहे. आता अजून आपल्यामागे काही येणार नाही,’ असे ते म्हणत. त्यांचे हे म्हणणे मला फार म्हणजे फार आश्वासक वाटत असे. बाबा दिवसभर राबून नोकरी करीत आणि संध्याकाळी अजून आर्थिक हातभार लागावा म्हणून फ्रीज रिपेअिरगचा जोडव्यवसाय करीत. आई-बाबा सोबत असले की सुरक्षित वाटत राही. द्वेष आजूबाजूला अजिबात नव्हता.

जेव्हा सरकारी नोकरीतील आरक्षणाची घोषणा आणि अंमलबजावणी झाली तेव्हा आमच्या एका सुज्ञ शिक्षकांनी आम्हाला शाळेत सांगितले, की आता तुमच्यापकी काही जणांना वेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. उपेक्षा सहन करावी लागू शकेल. ते शिक्षक स्वत:ला नोकरीत नव्याने येत असलेला अनुभव आम्हाला सांगून आमची भविष्ये सुधारू पाहत होते. मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांमधील आपुलकीने आणि पोटतिडकीने उत्तम शिकवणाऱ्या शिक्षकांची ती शेवटची पिढी ठरणार होती. आम्हाला ते शिक्षक म्हणाले की, ‘तुम्ही आता बाहेर परदेशात नोकऱ्या बघा. या देशात तुम्हाला आता कुणी विचारणार नाही. या देशातील प्रशासन, सुरक्षा आणि कायदा व्यवस्था कदाचित तुमच्या ओळखीची उरणार नाही. तुमचा यापुढे प्रचंड द्वेष केला जाईल. तुम्ही मुले यातून बाहेर पडा. कोणत्याही ठिकाणी उभे राहिलात तरी इतके गुणवत्तापूर्ण काम करा, की तुम्हाला डावलून चालणार नाही. टक्केवारी, आरक्षण याविषयी भांडत बसू नका. बुद्धीने आणि कष्टाने आपली जागा तयार करा. काहीही झाले तरी तुम्ही या देशात राहू नका..’

ते काय बोलत होते, ते समजण्याचे आमचे वय नव्हते. पण शाळा संपताच दोन-तीन वर्षांत आमचा जवळजवळ सर्व वर्ग अमेरिकेत निघून गेला आणि त्यापकी कुणीही परत आले नाही. कुणीही रडले नाही. कुणी गावोगावी ऊर बडवत मोच्रे काढत फिरले नाही. प्रवासाची तिकिटे काढतानासुद्धा अनेकांनी बँकेतून कर्जे घेतली. शिक्षणाची कर्जे घेतली आणि कष्ट करून ती फेडली. कुठेही आरडाओरडा आणि बीभत्स आरोप, शेरेबाजी असले काही न करता आमची पिढी मोठय़ा संख्येने देश सोडून गेली.

याचे कारण ‘जात’ होते, तसेच आर्थिक उदारीकरणाचा प्रवाह देशात खेळू लागला होता, हेसुद्धा होते. सॅम पित्रोदा आणि राजीव गांधी यावेळी आमच्यासाठी आणि आपल्या देशासाठी डिजिटल क्रांती घडवीत होते. अर्थव्यवस्था खुली होत होती. या सगळ्यामुळे सरकारी नोकऱ्या करणे कमी महत्त्वाचे मानले जाऊ लागले. प्रशासन आणि देशातील सरकारी कार्यप्रणाली सुशिक्षित आणि पांढरपेशा माणसाला अनोळखी आणि परकी वाटू लागली. आपल्या गरजा आणि आपली भाषा सरकारी यंत्रणेला कळत नाही, ही भावना फार मोठय़ा प्रमाणात वाढीला लागली. खासगी उद्योग आणि व्यवसाय, तसेच तंत्रज्ञान ही क्षेत्रे बुद्धिमान माणसांना खुणावू लागली आणि स्थलांतराचा फार मोठा ओघ सुरू झाला.

आरक्षणामुळे आमच्या पिढीला जातीची जाणीव झाली, तशीच धर्माची जाणीव बाबरी मशीद पडल्यामुळे झाली. आम्ही आजूबाजूच्या माणसांच्या आडनावाबद्दल सतर्क झालो. आडनावात व्यवहार आहे, तसेच आडनावात राजकारण आणि सत्ताकारण आहे याची जाणीव शाळा संपताच होऊ लागली. आडनावात संपत्ती आहे, हे कळले. पण मग आपल्या संपत्तीचे काय झाले? आपल्या आडनावाची संपत्ती कुठे आहे, असे विचारले तेव्हा सगळ्यांनी डोक्याकडे बोटे दाखवली. डोळे मोठे करून. जमिनी उरल्या नव्हत्या. सोने नव्हते. मोठी घरे उरली नव्हती. पूर्वज कमावून, वाडवडील गमावून बसले होते. गल्ल्यावर बसायची लाज आणि संकोच होता. फक्त बुद्धी. आणि जर कुणामध्ये शिल्लक असली तर कालसुसंगत दूरदृष्टी. काळ कसा बदलणार आहे, याची जाणीव. तंत्रज्ञान, भाषा, कुशल मनुष्यबळाची गरज आणि ओळखीचे वातावरण रातोरात सोडून जायची तयारी.

आणि मग जे मागे उरले त्यांना सावकाश द्वेषाचा अनुभव येऊ लागला. जगात जगायला बाहेर पडल्यावर आपल्या जातीमुळे आपला द्वेष करणारी किती माणसे आहेत, हे लक्षात येऊ लागले. ही जाणीव आपल्याला आधी का नाही झाली?

मी या काळात सुदैवाने सिनेमा करायचे ठरवले- जिथे फक्त गुणवत्ता आणि चिवटपणा कामी येतो. तुमचे आडनाव काहीही असो. आरक्षणाच्या गोंधळातून आणि लाचारीतून माझी आयुष्यभरासाठी सुटका झाली.

आíथक उदारीकरण, खासगीकरण आणि भांडवलवाद यांचे आकर्षण आमच्या पिढीला निर्माण होण्यासाठी जातीच्या राजकारणाने फार मोठा हातभार लावला, हे फार उशिराने माझ्या लक्षात आले.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com