08 March 2021

News Flash

करिअर इन ब्युटी!

सौंदर्यप्रसाधनांसंबंधित विविध करिअर संधी आज उपलब्ध आहेत. उत्तम मोबदला मिळू शकणाऱ्या या क्षेत्रात अलीकडच्या काही वर्षांत मोठे बदल घडत आहे. त्यानुरूप अभ्यासक्रमांची संख्याही वाढत आहेत.

| May 1, 2013 05:51 am

सौंदर्यप्रसाधनांसंबंधित विविध करिअर संधी आज उपलब्ध आहेत. उत्तम मोबदला मिळू शकणाऱ्या या क्षेत्रात अलीकडच्या काही वर्षांत मोठे बदल घडत आहे. त्यानुरूप अभ्यासक्रमांची संख्याही वाढत आहेत. त्याविषयी..
अलीकडे सेवा क्षेत्राला मोठी मागणी आहे. कोणत्याही प्रकारची सेवा तुम्ही उत्कृष्टरीत्या देत असाल तर ग्राहक नक्कीच आकर्षित होतात. महिलावर्गासाठी सेवा क्षेत्रातील अनेक व्यवसाय करिअरची उत्तम संधी उपलब्ध करून देतात. महिलांच्या सौंदर्यसाधनेसाठी आवश्यक असणारं कौशल्य प्राप्त केलं तर उत्तम करिअर उत्तमरीत्या करता येईल. दर्जेदार संस्थांमधून अभ्यासक्रम केल्यास थिअरी आणि प्रॅक्टिकल्सचा सराव चांगला होतो. त्याचा उपयोग स्वत:चे करिअर उभे करण्यासाठी होऊ शकतो. काही प्रशिक्षण संस्थांची माहिती पुढीलप्रमाणे-
जावेद हबीब प्रोफेशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेअर ड्रेसिंग : संस्थेचे अभ्यासक्रम- इन्टेन्सिव्ह कोर्स ऑन हेअर- २४ आठवडे, कॉम्प्रेहेन्सिव्ह कोर्स ऑन हेअर-१२ आठवडे, पार्ट टाईम कोर्स ऑन हेअर- १२ आठवडे, क्रॅश कोर्स ऑन हेअर- ४ आठवडे, मास्टर्स कोर्स ऑन हेअर-२ आठवडे, शार्ट कोर्स ऑन हेअर- १ आठवडे, अर्हता- १२वी/ पदवी. पत्ता : जावेद हबीब प्रोफेशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेअर ड्रेसिंग, कार्पोरेट ऑफिस, युनिट नं. ११-१४, लक्ष्मी प्लाझा बिल्डिंग नं. ९, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-५३ दूरध्वनी- ०२२- ४०१०५४७० मेल info@ jawedhabib.co.in
व्हीएलसीसी इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी, हेल्थ अँड मॅनेजमेंट : अभ्यासक्रम- डिप्लोमा इन कॉस्मेटॉलॉजी, पाच महिने. डिप्लोमा इन ब्युटी कल्चर, चार महिने. डिप्लोमा इन हेअर डिझायनिंग, चार महिने. अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन मेकअपएक महिना, डिप्लोमा इन डायटेटिक्स, हेल्थ अ‍ॅण्ड न्युट्रिशन, एक वर्ष आणि तीन महिने, डिप्लोमा इन न्यूट्रिशन अ‍ॅण्ड हेल्थ एज्युकेशन, एक वर्ष तीन महिने. पत्ता : व्हीएलसीसी इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी, हेल्थ अँड मॅनेजमेंट, फर्स्ट फ्ड४अर, १०१- १०२ श्रीकृष्ण को-ऑप. हासिंग सोसायटी नं. ३, कांदिवली पश्चिम, मुंबई. दूरध्वनी- ०२२ ३२१९८२००, वेबसाइट : www.vlccinstitute.com ई-मेल : info@vlccinstitue.com
नलिनी अँड यास्मिन एज्युकेशन : अभ्यासक्रम : हेअर ब्रश- १६ आठवडे. हेअर रिफ्रेशर कोर्स- ३ आठवडे. बाब्रेरिंग- ३ आठवडे. प्रोफेशनल मेकअप अँड हेअर स्टायिलग- ४ आठवडे. पर्सनल ग्रुिमग- ३ दिवस. पर्सनल मेकअप अँड हेअर स्टायिलग- ३ दिवस. ब्युटी बेसिक्स- ६ आठवडे. बॉडी ट्रिटमेंट अँड मसाज- २ आठवडे. पत्ता- भोलेनाथ प्लाझा, सीटीएस १२३८, गुरु नानक रोड, बांद्रा तलावाजवळ, वांद्रे- पश्चिम, मुंबई- ४०००५०, दूरध्वनी०२२- २६४२२०८४, मेल- education@nalini.in वेबसाईट www.nalini.in
लॅक्मे अकादमी : या संस्थेनं केस आणि चेहऱ्याचं सौंदर्य या विषयांवर पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- फौंडेशन इन स्किन केअर- ८ आठवडे, फौंडेशन इन हँड अँड फीट केअर- ४ आठवडे, फौंडेशन इन मेक अप- ५ आठवडे, फौंडेशन इन हेअर कट अँड स्टायिलग- ६ आठवडे, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन एस्थेटिक्स अभ्यासक्रमाचा- २० आठवडे. या अभ्यासक्रमात त्वचाशास्त्र, फेशिएल, प्रॉडक्ट केमेस्ट्री, नेल प्रॉडक्टस् अँड टेक्निक, बॅक्टेरिआलॉजी अँड सॅनिटेशन, फेशिएल अनाटॉमी अँड फिचर्स, वेगवेगळया समारंभानुसार मेकअप, यूझ ऑफ लॅटेस्ट स्किन केअर इक्विपमेंट या विषयांचा समावेश आहे. अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा हेअर. अभ्यासक्रमाचा २० आठवडे. या अभ्यासक्रमात हेअर कलर, स्ट्रेन्दिनग, अ‍ॅडव्हान्स्ड हेअर कट्स, फॅशनेबल हेअर स्टायिलग टेक्निक्स या विषयांचा समावेश आहे. वेबसाईट www. lakmetrainigacademy.com
ब्युटिक : या संस्थेनं पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेतफू प्रोफेशनल डिप्लोमा ऑफ ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंगसहा महिने. सेमी प्रोफेशनल डिप्लोमा ऑफ ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंग- २ महिने. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंग- १२ महिने. ब्युटी थेरेपी- सहा महिने. बॉडी थेरेपी- ३६ दिवस. अरोमा थेरेपी-१२ दिवस. नववधू मेक अप वर्कशॉप- १० दिवस. अ‍ॅडव्हान्स्ड हेअर कट वर्कशॉप- १० दिवस, डिप्लोमा इन अरोमा थेरेपी- ६० दिवस, डिप्लोमा इन लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज- ६० दिवस, डिप्लोमा इन रिफ्लेक्सोलॉजी- ६० दिवस, डिप्लोमा इन स्पोर्टस मसाज थेरेपी- ६० दिवस, ब्युटिक स्पा डिप्लोमा- ६० दिवस. पत्ता- ब्युटिक इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंग, मोगल लेन, माहीम मुंबई. मेल- mayabutic@gmail.com
इंडो-कॅनेडियन नॅशनल अकादमी : या संस्थेनं पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- डिप्लोमा इन हेअर स्टायलिस्ट, डिप्लोमा इन एस्थेटिशिएन, सर्टिफिकेट इन लेसर हेअर रिव्होवल, सर्टिफिकेट इन मेक अप आर्टस्टि, नेल टेक्निशिएन, सर्टिफिकेट इन मेडिकल एस्थेटिशिएन, कॉस्मेटालॉजी, स्पा थेरेपिस्ट, हाय टेक सर्टिफिकेट कोर्स इन वेट मॅनेजमेंट, हाय टेक सर्टिफिकेट कोर्स इन डायटिक्स अँड  न्युट्रिशन, हाय टेक सर्टिफिकेट कोर्स इन पर्मनंट मेकअप, हाय टेक सर्टिफिकेट कोर्स इन बोटोक्स अँड फिलर्स- या अभ्यासक्रमासाठी आवश्यक अर्हता- एमबीबीएस.पत्ता- इंडो-कॅनेडियन नॅशनल अकादमी, ३३, ३४ कार्तिक कॉम्प्लेक्स, न्यू लिंक रोड, अंधेरी- पश्चिम, मुंबई. दूरध्वनी- ०२२ २६७३३३८६ वेबसाईट- www.icna.in
क्लॉरा- इंटरनॅशनल : अभ्यासक्रम : हेअर कटस्, रिबॉडिंग, कलिरग, हेअर ट्रीटमेंटस्, स्पेशलाईज्ड स्कीन
ट्रीटमेंट, बॉडी मसाज- अर्हता-दहावी/ बारावी. पत्ता- राज कुटिर, तिसरा रस्ता, खार- पश्चिम, मुंबई-५२.
दूरध्वनी- ०२२- २६०४१९९६ वेबसाईट- www.clara.co.in
एमइटी : ट्रायकॉलॉजी या केशरोपण करणाऱ्या शास्त्राचे प्रशिक्षण देणारा पदवी आणि पदविका अभ्यासक्रम एमईटी इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रायकॉलॉजीमार्फत सुरू करण्यात आला आहे. पदवी अभ्यासक्रम- सहा महिने. अर्हता- एमबीबीए, बीएएमएस, बीएचएमएस. पदविका अभ्यासक्रम- तीन महिने. अर्हता- विज्ञान पदवीधर, बीफार्म, ब्युटिशिएन्स. पत्ता- एमईटी-आरआयसीएचएफईईएल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी, एमईटी कॉम्प्लेक्स, बांद्रा रिक्लेमेशन. मुंबई- ५०. दूरध्वनी- ०२२-२६४४००९६, वेबसाईट- www.met.edu
एनरिच सलून अँड ब्युटी अकादमी : अभ्यासक्रमडि प्लोमा इन हेअर ड्रेसिंग- चार महिने. डिप्लोमा इन बेसिक ब्युटी- ४५ दिवस. डिप्लोमा इन अ‍ॅडव्हान्स्ड ब्युटी-७५ दिवस. सर्टिफिकेट इन सलून मॅनेजमेंट- दोन महिने. मेक अप कोर्स१० दिवस. अ‍ॅडव्हान्स्ड हेअर कोर्स- २० दिवस, अ‍ॅडव्हान्स्ड कटिंग एॅड कलरिग- २ दिवस, मेन्स कटिंग -३ दिवस. पत्ता- एनरिच सलून अँड ब्युटी अकादमी, जी १/१२ शेरेटन क्लासिक, छतरसिंघ कॉलनी, अंधेरी कुर्ला रोड चकाला, अंधेरी ईस्ट, मुंबई- ४०००९३. दूरध्वनी- ०२२- ४०७३८०००,
ईमेल- education@enrichsalon.com, वेबसाईट- www.enrichsalon.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 5:51 am

Web Title: career in the beauty industry
Next Stories
1 मुंबई विद्यापीठ परीक्षांचा घोळ थांबता थांबेना!
2 प्राध्यापकांच्या संपाचा ‘सीएचएम’च्या विद्यार्थ्यांना फटका
3 उत्तर पत्रिका तपासण्याचे ‘आऊटसोर्सिग’!
Just Now!
X