24 February 2021

News Flash

दहावीचा आज ऑनलाइन निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल सोमवारी, ८ जून रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

| June 7, 2015 01:46 am

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल सोमवारी, ८ जून रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. मंडळातर्फे शनिवारी निकालाबाबतची घोषणा करण्यात आली. ऑनलाइन निकाल जाहीर केल्यानंतर १५ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थी २९ जूनपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या परीक्षेसाठी या वर्षी १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
संकेतस्थळांबरोबरच एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळू शकेल. राज्यातील बीएसएनएल मोबाइलधारकांना ५७७६६ या क्रमांकावर MHSSC < (स्पेस) परीक्षा क्रमांक > असा एसएमएस पाठवून आपला निकाल कळू शकेल. आयडिया, वोडाफोन, एअरसेल, रिलायन्स, युनिनॉर या कंपन्यांच्या मोबाइलवरून MH १० (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस ५८८८८१११ या क्रमांकावर पाठवल्यावर निकाल कळणार आहे. एअरटेल मोबाइलवरून निकाल पाहण्यासाठी MH  १० (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस ५२७०११ या क्रमांकावर पाठवायचा आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
lwww.mahresult.nic.in
lwww.maharashtraeducation.com
lwww.rediff.com/exams
lwww.knowyourresult.com/MAHSSC

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 1:46 am

Web Title: ssc maharashtra board online result on monday
Next Stories
1 नैसर्गिक कल असलेली शाखा निवडा
2 एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी ३९,३२८ विद्यार्थी पात्र
3 अभियांत्रिकीचे प्रवेश अर्ज आजपासून
Just Now!
X