इंग्लंडमधील मँचेस्टर शहरात जुल २०१३ मध्ये होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय भाषाशास्त्र ऑलिम्पियाडची पूर्वतयारी म्हणून मुंबई विद्यापीठात एक विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
येत्या २५ ते २९ डिसेंबर दरम्यान मुंबई विद्यापीठात १० ते ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून सहभागी विद्यार्थ्यांना भाषाशास्त्राची प्राथमिक ओळख करुन दिली जाणार आहे.
जुलै २०१३ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भाषाशास्र ऑलिंम्पियाडसाठी संपूर्ण भारतातून अंतिम चार विद्यार्थ्यांचा संघ निवडण्यात येणार आहे. त्यापूर्वी दोन फेब्रुवारी, २०१२ रोजी अखिल भारतीय स्तरावर ‘पाणिनी लिंग्विस्टिक्स ऑलिम्पियाड’ होणार असून त्यानंतर होणाऱ्या दोन निवड प्रक्रियांमधून अंतिम चार विद्यार्थ्यांना मँचेस्टरमध्ये होणाऱ्या ऑलिम्पियाडकरिता संधी मिळणार आहे.
‘पाणिनी लिंग्विस्टिक्स ऑलिम्पियाड’तर्फे  विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी  https://sites.google.com/site/paninilinguisticsolympiad/ workshops  संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच मानसी नाडकर्णी यांच्याशी  manasi_n7@hotmail.com  वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.