18 January 2018

News Flash

दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्यात सत्ताधारी अपयशी – शरद पवार

राज्य दुष्काळात होरपळत असताना मोदी अमेरिकेत जाऊन ओबामांच्या हाती बळेच हात गुंतवत आहेत.

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: June 27, 2016 2:14 AM

Sharad pawar: मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे असे शरद पवारांनी म्हटले.

सत्ताधारी दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत. कामगार, महिला, दलित, सामान्य जनता यांच्या विरोधात असलेली शक्ती पुन्हा उभी राहू द्यायची नाही. त्यासाठी आगामी पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून लढावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलताना केले. येथील शाहू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या मेळाव्यात पवार यांनी केंद्र व राज्य शासनाची कामगिरी अपयशी ठरल्याचे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शेतकरी वेदनेत, कामगार कष्टात, उद्योग बंद आहेत. सत्ता कोणासाठी राबवली जात आहे हे कळत नाही. त्यामुळे अच्छे दिन हेच का, असा प्रश्न पडत आहे, अशी टीका त्यांनी केली.
आजच्या शाहू जयंती दिनाचा संदर्भ देत पवार म्हणले, दुष्काळ पडला असताना शाहू महाराजांनी पाहणी करून मदत केली. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनीही दुष्काळात जनतेला दिलासा दिला. पण राज्य दुष्काळात होरपळत असताना मोदी अमेरिकेत जाऊन ओबामांच्या हाती बळेच हात गुंतवत आहेत. त्यांनी जरूर जगभर दौरे करावेत पण त्याआधी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखून त्यांना मदत करावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांचे रणिशग फुंकल्याची घोषणा करून प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पवारांचे प्रगल्भ नेतृत्व लाभले असल्याने आपल्याला जातीयवादी शक्ती रोखता येणे शक्य असल्याचा दावा केला. आमदार हसन मुश्रीफ यांनी आगामी निवणुकीत तरुणांना अधिक संधी देऊन पक्षाला यश मिळवून देणार असल्याचे सांगितले. संसदेतील प्रभावी कामगिरीचे श्रेय शरद पवार यांना देताना खासदार धनंजय महाडिक यांनी मुलींची छेड काढणाऱ्यांना दांडके हाती घेऊन चोप देण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली. निवेदिता माने, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांची भाषणे झाली.

First Published on June 27, 2016 2:14 am

Web Title: bjp government failed to fulfill the promise done by them says sharad pawar
 1. P
  Pandu
  Jun 27, 2016 at 12:26 am
  कुत्रा भुंकला
  Reply
  1. P
   Prasad
   Jun 27, 2016 at 3:06 am
   प्रचंड पैसा मिळवण्याचे, पक्षात स्वतः:ची घराणेशाही आणण्याचे तुमचे स्वप्न तर पुरे झाले. 15 वर्षे तुम्हाला सत्ता दिली पण लवासा, डी.बी. रियल्टी, इरिगेशन घोटाळा , क्रिकेटमधील सट्टेबाजी, शेतकरींच्या आत्महत्त्या ,धरणात लघवी, एयर इंडियाची वाट लावणे.. ही 'सत्कृत्ये' आपल्याकडून व आपल्या पक्षाकडून झाली. आपले मोठे साथीदार जेलमध्ये आहेत.. 40 वर्षात आपण देशाला काय दिलेत ह्यावर जरा आत्मसंशोधन करा... मग दुसर्याकडे बोट दाखवा.
   Reply
   1. V
    vijay
    Jun 27, 2016 at 9:34 am
    महाराष्ट्राच्या राजकारणात 40 वर्षे घालवल्यावर सुद्धा "सत्ता कोणासाठी राबवली जात आहे हे कळत नाही. त्यामुळे अच्छे दिन हेच का?" असा प्रश्न ज्याला पडत आहे त्याला पवारांचे अनुयायी 'जाणता राजा' म्हणतात यावरून राष्ट्रवादीची पातळी ओळखावी. मग लोकांनी कंटाळून सत्तापालट केला तर थयथयाट कशाला?
    Reply
    1. R
     Ramesh Vedak
     Jun 26, 2016 at 9:46 pm
     गेल्या पंधरा वर्षात या लोकांनी दुष्काळ नियोजनासाठी कारवाई न केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवलेली आहे.गेली दोन वर्ष पावसाने ओढ दिल्यामुळे आज ही परिस्थिती उध्दभवलेली असली तरी गेल्या दोन वर्षात या सरकारने केलेल्या कामांचे सुपरिणाम यंदाच्या चांगल्या पावसामुळे दिसून येतील व जलयुक्त शिवरासारख्या योजनांमुळे यापुढे अशी दुष्काळी परिस्थिती नक्कीच उद्भवणार नाही.आणि तीच भीती वाटत असल्यामुळे काँग्रेसी नेते अगोदरच शेतकऱ्यांचं दिशाभूल करण्याचं प्रयत्न करीत आहेत.कारण नंतर खरोखरच अच्छे दिन आले तर पुढे त्यांचं na
     Reply
     1. Sudhir Karangutkar
      Jun 27, 2016 at 3:08 pm
      त्यांनी स्वप्न दाखविली आणि पूर्ण करण्याचे प्रयत्न तरी केले पण तुम्ही फक्त तुमची खळगी भरली वारेमाप भ्रस्टाचार करून तो नियमित कसा करता येईल तो पहिला आणि केलादेखील तुम्ही काय करणार हे तुमच्या चमचा व्यतिरिक्त सगळ्या देशाला कळून चुकला आहे म्हणून तुम्हाला देशातील राजकारानातं देखील उभे करीत नाही आता पुतण्याला व स्वतःला अटक होऊ नये म्हणून काहीही विधाने करून सरकारला घाबरवू इच्छिताहे पण वेळ आली की सगळं मार्गी लागेल
      Reply
      1. s
       s.v.kulkarni
       Jun 27, 2016 at 4:17 am
       पवारांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचया प्रचंड घाणीमुळेच विद्यमान सरकारची वाटचाल अवघड झाली आहे. ते अडथळे दूर करण्यात वेळ व शक्ती खर्च होणारच. त्यानंतरच सुधारणा दिसून येईल.माननीय पोपटराव पवारांनी आजच म्हंटले आहे की मागील सरकारने शेतकऱ्यांना अगतिक व दुबळे केले.जातीयतेचा वणवा पेटवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा पवारांचा जुनाच उद्योग आहे.सकारात्मक ,स्वच्छ राजकारण करणे पवारांना कधीही जे नाही.
       Reply
       1. सुहास
        Jun 27, 2016 at 3:38 pm
        शरद पवारांना दूषणे देऊन स्वतःचा जातीय अजेंडा लपवता येऊ शकेल पण मोदींनी दाखवलेल्या स्वप्नांविषयी सामान्य जनतेचे हेच मत आहे. जनता मूर्ख नाही.
        Reply
        1. S
         surekha
         Jun 27, 2016 at 9:36 am
         जातीयवादी (85%) मतदार मोदीं वर प्रसन्न आहेत. तंबाखू, गुटखा खाऊन - खाऊन कॅन्सर झाला व तोड पण वक्रतुंड झाले परंतु स्वतःच्या अनुभवावरून ह्यावर बंदी आणण्या करिता आंदोलन कां नाही छेडले. राजकारणाची मस्ती इथे दाखवा उगाच राष्ट्रवादीचे भ्रष्ट्र कार्यकर्त्यां समोर मोदींना शिव्या घालून मतदारांना कां भडकविता. जातीयवादी मतदार (85%) दुधखुळा नाही त्याला कोण खरं कोण खोट ते कळत तुमच्या सल्ल्याची काहीही आवश्यकता नाही. राष्ट्रवादी अनामत रकमे ह्यापुढील सर्व निवडणुकी मध्ये आपटी खाणार आहे. कळले कां ?
         Reply
         1. S
          surekha
          Jun 27, 2016 at 9:21 am
          वाकड तोंड्या वक्रतुंड शरद काकाला म्हातारचळ लागलाय रोज वाकड बोलायचं ह्या वर्षी उत्तर प्रदेश सोडल्यास इतर सर्व राज्यात उन्हाळ्यात वीज भरपूर प्रमाणात उपलब्ध होती कुणा मुळे मोदींन मुळ्ये. काका घरी पेटयां मध्ये भरलेला काळा पैसा 30 सप्टेंबर पर्यंत जाहीर करायचंय हे माहीत आहे ना, नाहीतर विसराल. मोदींना जनतेनी विमान उडवायला दिले आहे त्याचा ते पुरेपूर उपयोग करीत आहेत तुमच्या पोटात का दुखते ते मतदारांना सांगा. मोदी दुष्काळ सॅटेलाईट नि बघतात व जलशिवारची दुष्काळी कामे झाली आहेत किंवा नाही याची झाडाझडतीघेतात
          Reply
          1. V
           veeresh
           Jun 27, 2016 at 7:24 am
           पवारांना सरकार विरुद्ध बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? त्यांच्या सरकारने काय दिवे लावले ते आम्ही जाणतो.
           Reply
           1. Load More Comments