कोल्हापूर : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व शेतकरी चळवळीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा तळागाळात पोहोचविण्यासाठी मी लोकसभेची निवडणूक लढवित असून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारास व कार्यास तडा जाईल असे एकही काम माझ्या हातून घडले नाही. त्या नैतिकतेच्या जोरावर आज चौथ्यांदा लोकसभेच्या निवडणूकीचा प्रचार शुभारंभ क्रातिंसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून करत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.

सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे गाव असलेल्या मच्छिंद्र येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत प्रचार शुभारंभ केला.

eid ul adha sangli marathi news
सांगली: ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी
keshav upadhye replied to anil deshmukh allegation
“माजी गृहमंत्र्याचा अभ्यास कायद्याचा नसून केवळ १०० कोटींच्या वसुलीचा, त्यामुळे…”; अनिल देशमुखांच्या ‘त्या’ आरोपाला भाजपाचं प्रत्युत्तर!
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : अजित पवार गटाच्या मर्यादा स्पष्ट
devendra fadnavis
नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले “आम्ही…”
Ajit Pawar Yugendra Pawar Sharad Pawar
शरद पवार बारामती विधानसभेत युगेंद्र पवारांना अजित पवारांविरोधात उभं करणार? जितेंद्र आव्हाड म्हणाले…
Jayant Patil
“पिपाणी चिन्हामुळे आम्हाला…”, जयंत पाटलांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “साताऱ्याची जागा…”
agriculture not an issue in pm narendra Modi campaign
मोदींच्या प्रचारात यंदा शेतीचा मुद्दा का नव्हता? जाणून घ्या ‘कारण’
Manmohan Singh
शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी मनमोहन सिंग यांचे जनतेला उद्देशून पत्र; म्हणाले, “लोकशाही वाचवण्यासाठी…”

हेही वाचा…खासदार मंडलिक कुणाच्या नादाला लागलेले नसल्याने त्यांचा संसार टिकून; राजेखान जमादार यांची सतेज पाटील यांच्यावर घणाघाती टीका

यावेळीबोलताना राजू शेट्टी म्हणाले की देशामध्ये लोकसभेचे बिगुल वाजले आहे. गल्लीतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न दिल्लीच्या संसदेत प्रभावीपणे मांडून त्यांना वाचा फोडली पाहिजे. शेतकरी , कामगार , छोटे मोठे उद्योजक , व्यापारी यांच्यासह सर्वच घटकातील लोक सरकारच्या धोरणावर असमाधानी आहेत. विद्यमान खासदार हे प्रश्न मांडण्यासाठी कमी पडले असून हजारो कोटाची बोगस कामे दाखवून जनतेची दिशाभूल करत आहेत.

पाच वर्षात अज्ञात वासात गेलेले धैर्यशील माने सध्या स्वत:च कर्तृत्व नसल्याने मोदींच्या जीवावर मते मागत आहेत. त्याबरोबरच महाविकास आघाडीच्या उमेदवाराची सुध्दा तीच अवस्था असून १० वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात ते कधीही विधानसभेत शेतकरी , कामगार , कष्टकरी लोकांचे प्रश्न मांडले असल्याचे ऐकिवात नाही. मतदारसंघातील विकासकामांना खो घालण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळेच त्यांचा विधानसभेला पराभव झाले असल्याची टिका शेट्टी यांनी केली.

हेही वाचा…कोल्हापूर, इचलकरंजीत दमदार पाऊस; झाड कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी

एक नोट एक व्होट

२००९ प्रमाणे सामान्य जनतेने माझी निवडणूक हातात घेतली असून प्रचाराची यंत्रणा गतिमान केलेली आहे. लोकांनी लोकवर्गणी गोळा करून एक व्होट व एक नोट प्रमाणे देशामध्ये लोकशाहीचे बळकटीकरणाचा आदर्श पुन्हा एकदा हातकंणगले लोकसभा मतदारसंघातील जनता घडवून आणत आहे. महागाई , बेरोजगारी , शेतीमालाचे पडलेले दर , औद्योगिक क्षेत्रात आलेली मंदी व त्यामुळे झालेले नुकसान , शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, समाजा -समाजात निर्माण होत असलेले तेड यामुळे जनता मेटाकुटीस आलेली आहे. सामान्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी स्वच्छ व प्रामाणिक चेहऱ्याची आवश्यकता असून विरोधकामधील बरबटलेले उमेदवार स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी धडपडत आहेत.

हेही वाचा…कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण

यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून नारळ फोडून प्रचार शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास वाळवा तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान प्रा. डॅा. जालंदर पाटील , सावकर मादनाईक , ॲड. एस. यु . सनदे , सुर्यभान जाधव , पोपट मोरे , संदीप राजोबा , डॅा. श्रीवर्धन पाटील , भागवत जाधव यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.