01 March 2021

News Flash

महालक्ष्मीच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह

मिश्रांचा खुलासा समाधानकारक

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवपदी शुभांगी साठे असताना श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर  रासायनिक संवर्धन जुल २०१५मध्ये करण्यात आले. यानंतर पुन्हा गतवर्षी मे महिन्यात रासायनिक प्रक्रिया पार पडली. तेव्हा देवस्थान समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर हे काम पुरातत्त्व खात्याचे अधिकारी एम. के. सिंग यांनी घाईगडबडीत उरकले. यामुळे संवर्धन प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासाठी दोषी असणाऱ्या शुभांगी साठे आणि एम. के. सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी येथे शुक्रवारी केली.

देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात देवस्थान समिती आणि पुरातत्त्व खाते यांच्यासोबत झालेल्या संयुक्त बठकीत ते बोलत होते. या वेळी समिती सचिव विजय पवार, सहसचिव शिवाजीराव  साळवी, संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रुमख विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बठकीत देवस्थान समिती सदस्यांना पवार यांनी धारेवर धरले. रासायनिक प्रक्रियेचा अहवाल आणि चित्रफीत तुम्ही का पाहिलेली नाही, त्यात ज्या घटकाची चूक असेल त्यावर कारवाई आजतागायत का झालेली नाही, अहवालाबाबत श्रीपूजकांना का जाब विचारला नाही, संवर्धनानंतर आद्र्रता समितीने दिलेल्या सूचना श्रीपूजक पाळतात की नाही यावर तुमचे लक्ष का नाही, असा प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.

यावर देवस्थान समिती सदस्या संगीता खाडे यांनी काही गोष्टी करण्याची कबुली दिली. आद्र्रता समितीने दिलेल्या सूचनांचा पाठपुरावा केला जाईल. सर्व प्रकारचे  नियम मंदिराच्या आत आणि बाहेर लावण्यात येतील. ते श्रीपूजकांकडून पाळले गेले नाहीत तर मग देवस्थान समितीही त्यांना आपला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही खाडे यांनी स्पष्ट केले. श्रीपूजकांबराबेरच लवकरच बठक घेतली जाईल असेही सांगितले.

सचिव विजय पवार म्हणाले, श्री महालक्ष्मी मूर्तीवरील रासायनिक प्रक्रिया जुल २०१५मध्ये झाली. मी गतवर्षी ऑगस्ट १६ महिन्यात पदभार स्वीकारला असल्याने या प्रक्रियेबाबत मी चौकशी करून माहिती देईन, असा खुलासा केला. बठकीला शिवसेनेचे रवि चौगुले, शुभांगी साळोखे, दीपाली िशदे, हर्षल सुर्वे, अ‍ॅड, प्रसन्न मालेकर उपस्थित होते.

मिश्रांचा खुलासा समाधानकारक

श्री महालक्ष्मी आम्हा सर्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तिच्या मूर्तीवर मनमानी, सोयीचे प्रयोग व्हायला नकोत. तथापि, श्रीकांत मिश्रांनी या मूर्तीवरील पांढऱ्या डागांबाबत आणि एकूणच संवर्धनाबाबत व्यक्त केल्या जाणाऱ्या शंकाकुशंकांबाबत केलेला खुलासा समाधानकारक वाटला, अशी टिप्पणी संजय पवार यांनी केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 1:35 am

Web Title: chemical enrichment process at mahalakshmi temple
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला
2 ‘लोकशाहीला तिलांजली दिल्यामुळेच विरोधकांना देशात स्थान नाही’
3 गळक्या योजना आणि पैशांची उधळपट्टी
Just Now!
X