News Flash

कोल्हापुरात गारांचा जोरदार पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. सायंकाळी आलेल्या पावसाने अवघे शहर जलमय झाले. जिल्ह्याच्या अन्य भागातही पावसाने झोडपून काढले.  चैत्र पौर्णिमेला

कोल्हापुरात गुरुवारी सायंकाळी गारांचा जोरदार पाऊ स झाला. अनेकांनी गारा अशा भांडय़ात साठवून ठेवल्या होत्या.

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. सायंकाळी आलेल्या पावसाने अवघे शहर जलमय झाले. जिल्ह्याच्या अन्य भागातही पावसाने झोडपून काढले.  चैत्र पौर्णिमेला कोल्हापुरात चांगला पाऊस झाला होता. काही भागात मोठी गारपीट झाली होती. त्यानंतर पुन्हा उकाडा वाढला होता. आज सायंकाळी ढग दाटून आले. पाठोपाठ वादळी वाऱ्याला सुरुवात झाली.  गारांचा जोरदार पाऊस पडला. रस्तोरस्ती गारा पडल्या. त्याची छायाचित्रे समाज माध्यमातून अग्रेषित करण्यात आली. काही मुलांनी पावसात खेळण्याचा आनंद लुटला. इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ तसेच अन्य भागातही जोरदार पाऊस पडला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:18 am

Web Title: heavy rain with hailstorm in kolhapur zws 70
Next Stories
1 राज्यातील बांधकाम मजुरांच्या खात्यात १३७ कोटींचा निधी जमा
2 ‘गोकुळ’चा सत्तासंघर्ष आजी-माजी लोकप्रतिनिधींमध्ये!
3 ‘गोकुळ’मध्ये सत्तापरिवर्तन की पुन्हा सत्ताधारीच?
Just Now!
X