21 September 2020

News Flash

मोलकरणीवर बलात्कार; इचलकरंजीत एकास अटक

पीडित महिलेची चार वर्षांपासून संशयित अंकुश काचोळे याच्याशी ओळख होती.

प्रतिकात्मक छायाचित्र

मोलकरणीवर बलात्कार प्रकरणी इचलकरंजी येथील इंदिरा कॉलनीतील अंकुश सखरामजी काचोळे या व्यवस्थापकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. तो मुळचा सावेडी, अहमदनगर येथील रहिवाशी आहे. त्याला शनिवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पीडित महिलेची चार वर्षांपासून संशयित अंकुश काचोळे याच्याशी ओळख होती. अहमदनगरमध्ये पीडित महिला कामास होती. त्यावेळी काचोळे हा त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. ही कंपनी बंद पडल्यानंतर सात महिन्यांपूर्वी काचोळे याने संबंधित महिलेस फोन करून हातकणंगले येथील कंपनीत काम असल्याचे सांगितले. त्यानुसार पीडित महिला व तिचा पती कुटुंबीयांसह हातकणंगले येथे राहण्यास आले. तर हातकणंगले येथील एका फौंड्रीत काचोळे सध्या व्यवस्थापक म्हणून कामास आहे. पीडित महिला चार महिने एका फौंड्रीत कामासाठी जाते. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब इंदिरा कॉलनीत भाडय़ाने राहण्यास आले. त्यावेळी संबंधित महिला अंकुश याच्या घरी साफसफाईचे काम करते होती. २१ मार्चला संशयित घरीच होता. त्यावेळी त्याने या महिलेस जबरदस्तीने घरातील खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार पतीस सांगून बदनामी करीन अशी धमकीही त्याने दिली. महिलेने फिर्याद दिल्याने काचोळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी होता. त्याला पोलिसांनी अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 12:05 am

Web Title: house maid rape in ichalkaranji
Next Stories
1 घरफाळा, पाणी पुरवठय़ावरून कोल्हापूर स्थायी सभेत गोंधळ
2 सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही – चंद्रकांत पाटील
3 ‘नैसर्गिक शेती’च शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू शकेल’
Just Now!
X